पिंपरी : प्रतिनिधी : ज्यांना काही उद्योग शिल्लक नाही तेच हिंदीला विरोध करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली. पिंपरी चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. (Ajit Pawar on hindi)
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात पहिली पासून हिंदी भाषा शिकवली जाणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला असून रस्त्यांवर उतरुन संघर्षाची तयारी दर्शवली आहे. मनसेकडून हिंदीला विरोध केला जात आहे या प्रश्नांवर अजित पवार म्हणाले, “मराठी ही मातृभाषा असून हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. काही महिन्यापूर्वी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जला दिला आहे. तर इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. तिन्ही भाषा आपल्यासाठी महत्वाच्या आहेत”. हिंदीला विरोध करण्याचे कारण नाही. ज्यांना काही उद्योग शिल्लक नाही, तेच हिंदी भाषेला विरोध करतात, अशी टीकाही त्यांनी नाव न घेता राज ठाकरेंना केली. (Ajit Pawar on hindi)
बीडमध्ये महिलेला झालेल्या अमानुष मारहाणीच्या प्रश्नांसंदर्भात अजित पवार म्हणाले, बीडमध्ये ज्या महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली, तिच्या फोटो मला रात्री उशिरा मिळाले आहेत. जे दोषी असतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. (Ajit Pawar on hindi)
नाशिक दंगल प्रकरणात आम्ही कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून गुन्हा दाखल केलेला नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करत आहोत. कोणालाही सोडले जाणार नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. (Ajit Pawar on hindi)
हेही वाचा :