एसआयआर’ च्या माध्यमातून भाजपाचा मतदारसंघ फोडण्याचा  डाव 

A ploy to split the BJP's constituency through 'SIR'

जमीर काझी : मुंबई :  राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेच्या माध्यमातून भाजपाचा आपल्याला हवा तसा मतदारसंघ बनविण्याचा डाव आहे, असा आरोप करीत त्यांचा हा प्रयत्न महाराष्ट्रातील जनता हाणून पाडेल, असा निर्धार  महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी बुधवारी केला. त्याचप्रमाणे  राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन राज्यातील निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील विविध महत्त्वाच्या मुद्दे व   विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिम पारदर्शक व निपक्षपातीपणे राबवण्याबाबत निवेदन देण्यात आले. (A ploy to split the BJP’s constituency through ‘SIR’) 

या शिष्टमंडळात काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील,  प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील, शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे, माजी मंत्री अनिल परब, राजेश टोपे, डॉ. विश्वजीत कदम, खासदार धैर्यशील पाटील, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, समाजवादी पक्षाचे आ. रईस शेख,  सचिन सावंत,  शिवराज मोरे,  ॲड. संदेश कोंडविलकर, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन तसेच महाविकास आघाडीचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. (A ploy to split the BJP’s constituency through ‘SIR’) 

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, पात्र मतदारांची नावे अन्यायकारकरीत्या वगळली जाणार नाहीत याची खात्री करावी तसेच बनावट व दुबार नोंदींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. ग्रामीण, आदिवासी, स्थलांतरित, वंचित आणि दुर्बल घटकांतील मतदारांना कोणत्याही तांत्रिक कारणामुळे मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवले जाऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्याची मागणीही करण्यात आली.

यासोबतच मतदान केंद्रांचे नियोजन, मतदान यादीतील त्रुटी दुरुस्ती, बूथ लेव्हल अधिकाऱ्यांचे कामकाज, मतदार नोंदणी प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सर्व राजकीय पक्षांना समान संधी मिळावी याबाबतही निवडणूक आयोगासमोर विविध मुद्दे मांडण्यात आले. लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने निष्पक्ष भूमिका घ्यावी, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले. (A ploy to split the BJP’s constituency through ‘SIR’) 

Related posts

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. आर.के. कामत यांची निवड

भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर

राष्ट्रवादीचे प्रवक्ते विलास लवांडेंना अटक, संग्राम भंडारे मोकाट