50 thousand per hectare : महाराष्ट्रातील शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार मदत द्या : उद्धव ठाकरे

50 thousand per hectare

मुंबई : प्रतिनिधी : बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ७५ लाख महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा केले आहेत. बिहारला मदत केली म्हणून पोटदुखी नाही. पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाला भरभरुन मतदान केले आहे. त्याच महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे. या शेतकऱ्यांला हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. (50 thousand per hectare)

उद्धव ठाकरे म्हणाले, “ अतिवृष्टीमुळे शेत जमीन पुन्हा पीक घेण्यायोग्य बनवण्यासाठी तीन ते पाच वर्ष लागतील. आता जाहीर केलेली मदत जेमतेम हेक्टरी सात ते आठ हजार रुपये आहे. आता जमीन साफ करायचाच एकरी खर्च पाच लाख आहे. शेत जमिनीला पीक योग्य बनवण्यासाठी दोन ते तीन वर्ष लागणार आहेत. .ता शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज असल्याने कर्जफेडीच्या विवंचनेत तो आहे.  रोज  शेतकरी आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. एका घरात ३१ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली. त्याला पंधरा ते वीस दिवसांच बाळ आहे. मागच्या दोन तीन वर्षात जाहीर केलेली मदत शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही” याकडे त्यांनी लक्ष वेधले. (50 thousand per hectare)

. “२०१७ च्या कर्जमाफीची अजून प्रतिक्षा आहे.माझं सरकार आलं तेव्हा मी कालबद्ध पद्धतीने कर्जमाफी केली. संकट आल्यावर पंचाग काढून बसलो नाही. मला यात राजकारण आणायचं नाही. पण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मागणी करणं मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल तर त्यांनी तसं समजावं” असेही उद्धव ठाकरे म्हणाले. (50 thousand per hectare)

उद्धव ठाकरे म्हणाले, “शेतकऱ्याला सरसकट कर्जमुक्त करा. पंजाबमध्ये हेक्टरी 50 हजार रुपये कालबद्ध मदत तिथल्या सरकारने शेतकऱ्याला जाहीर केली.याला म्हणतात सरकार. पंतप्रधानांनी पंजाबला १६०० कोटी आणि हिमाचलला १५०० कोटीची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातही हेक्टरी शेतकऱ्याला ५० हजार रुपये मदत द्या. महाराष्ट्रात डबल इंजिनच सरकार आहे. मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले, परिस्थितीवर चर्चा केली. दयावान पंतप्रधानांनी प्रस्ताव पाठवायला सांगितला. समोर शेतकऱ्यांचे नुकसान दिसतय तर प्रस्ताव कसला पाठवायचा?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

“महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून पंतप्रधान इथे येत नाहीत का? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी  बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७५ लाख महिलांच्या खात्यात १०  हजार रुपये दिले आहेत . बिहारला मदत करताय म्हणून पोटदुखी नाही. पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाल भरभरुन मतदान केलं, आज त्याच महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे” याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले. (50 thousand per hectare)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर