फडणवीसांना पदावरून हटविण्यासाठी खरातकडे ३८ आमदारांनी करंगळी  कापली  : जितेंद्र आव्हाड

38 MLAs severed their little fingers

जमीर काझी :  मुंबई : देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरुन दूर करण्यासाठी राज्यातील ३८ आमदारांनी अघोरी पूजेचा घाट घातला होता. अशोक खरातनेही त्यांना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करु, असे आश्वासन दिल्याचा सनसनाटी दावा  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड  यांनी बुधवारी केला. 

खरातला वाचवण्यासाठी अनेकांनी पैसे घेतले

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावातील चर्चेत सहभाग घेताना  आव्हाड यांनी अशोक खरात आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांबाबत अनेक स्फोटक दावे केले. ते म्हणाले,’  खरात याला वाचवण्यासाठी २००७ साली पहिला बळी पत्रकार बाळू तुपे याचा देण्यात आला. त्यावेळी या प्रकरणाची नाशिकमध्ये प्रचंड चर्चा होती. वृत्तपत्रातही त्याबाबत छापून आले होते. त्यामुळे अशोक खरात कोण हे पोलिसांना माहिती नव्हते, अशातला भाग नव्हता. या सगळ्या आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी किती पैसे घेतले ते फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती आहे. अनेक बडे अधिकारी खरातच्या समोर लोटांगण घालायचे, त्यांनी खरातला वाचवण्यासाठी बरेच पैसे घेतले, असा आरोपही आव्हाडांनी केला. (38 MLAs severed their little fingers)

अघोरी पुजेतून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न

जितेंद्र  आव्हाड म्हणाले,’ फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी काळी जादू आणि अघोरी विद्येच्या माध्यमातून प्रयत्न सुरु होता. मी खात्रीने  राधाकृष्ण विखे -पाटील यांचे बोटही तपासणार आहे.  फडणवीसांना दूर करण्यासाठी अघोरी विद्येचा घाट सांगतो की अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्यासाठी काहीजण प्रयत्न करत होते. हे सर्वजण अशोक खरातकडे पूजा घालायला गेले होते. वेळ आल्यावर मी त्यांचे नाव उघड करेन. ही सगळी माहिती सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांना मिळाली होती. या नेत्यांच्या खरातसोबत बैठका झाल्या होत्या. तेव्हा  खरातने त्यांना  ‘मला थोडे दिवस द्या, मुख्यमंत्री घरी गेलेले असतील.’ असे आश्वासन दिले होते. (38 MLAs severed their little fingers)

विधानभवनात सगळे आमदार एकमेकांची बोटे तपासतायेत

अशाप्रकारच्या काळ्या जादूला आपण राज्यमान्यता देणार असू, सरकारी पैसा देणार असू, ईशान्येश्वर मंदिरासाठी कमानी बांधल्या, टाक्या बांधल्या, हा अशोक खरात इतका मोठा कोण होता? असा प्रश्न विचारात आव्हाडांनी मला एका गोष्टीचे वाईट वाटतंय की, या तुकारामांच्या महाराष्ट्रात, ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्रात, शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण काळ्या जादूला इतकी मान्यता देतोय, अशी खंत व्यक्त केली. राजकारणात काळ्या जादूने काहीही होऊ शकते, असे समस्त आमदारांना वाटू लागले आहे. माझ्याकडे ३८ आमदारांची लिस्ट आहे, त्यांनी  खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्या होत्या. परवा विधानभवनात सगळे आमदार एकमेकांची बोटं तपासून पाहत होते, तू खरातकडे जाऊन आलास का, विचारत होते. ही परिस्थिती महाराष्ट्रात आहे. या बाबासाठी सरकाराचा पैसा जातोय, रस्ते बनवले जात आहेत. शिक्षण खाते, म्हाडा, एसआरए सगळ्या पोस्टिंग खरातकडून केल्या जात आहेत. हे काय सुरु आहे? अशोक खरातच्या ट्रस्टच्या सदस्यांना  अजून अटक का झाली नाही, असा सवाल  आव्हाड यांनी उपस्थित केला. (38 MLAs severed their little fingers)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर