10 Naxals killed : चकमकीत दहा नक्षलवादी ठार

10 Naxals killed

रायपूर : छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात गुरुवारी (११ सप्टेंबर) दुपारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य मनोज उर्फ ​​मोडेम बालकृष्ण यांच्यासह १० नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. सुरक्षा दलाची शोधमोहीम अद्याप सुरूच आहे. (10 Naxals killed)

दुपारी माटल परिसरातील जंगलात ही चकमक झाली. बालकृष्ण आणि इतर सशस्त्र माओवादी परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यावरून बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.(10 Naxals killed)

‘‘स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ), जिल्हा पोलिस युनिट ई-३०, सीआरपीएफचे कोब्रा कमांडो आणि इतर राज्य पोलिस दलांचे जवान या कारवाईत सहभागी आहेत. अधूनमधून गोळीबार सुरूच आहे,’’ असे आयजी (रायपूर रेंज) अमरेश मिश्रा यांनी म्हटले आहे.

‘‘आतापर्यंत माओवाद्यांच्या वरिष्ठ नेत्यासह दहा नक्षलवादी मारले गेले आहेत,’’ असे मिश्रा यांनी सांगितले. ऑपरेशन अजूनही सुरू असल्याने अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.(10 Naxals killed)

वरिष्ठ नक्षलवाद्यांच्या हालचालींबद्दल गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी राज्याची राजधानी रायपूरपासून १८० किमी पेक्षा जास्त अंतरावर कारवाई केली तेव्हा मैनपूर पोलिस स्टेशन हद्दीतील जंगलात ही चकमक झाली.

या ताज्या चकमकीसह, या वर्षी छत्तीसगडमध्ये २४१ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यापैकी बस्तर विभागात २१२, रायपूर विभागातील गरियाबंदमध्ये २७ आणि दुर्ग विभागातील मोहला-मानपूर-अंबागड चौकीमध्ये दोन नक्षलवादी मारले गेले. जानेवारी महिन्यात याच मैनपूर भागात झालेल्या चकमकीत १६ नक्षलवादी मारले गेले होते. गेल्या वर्षी राज्यात २१९ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर