युवक काँग्रेसची भाजप कार्यालयासमोर निदर्शने 

Youth Congress protests outside the BJP office in Mumbai

जमीर काझी : मुंबई : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हल्द्वानी येथील सभेनंतर सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’  केल्याच्या घटनेचा मुंबई युवक काँग्रेसने तीव्र निषेध केला. भाजप-आरएसएसच्या कथित जातीयवादी आणि मनुवादी मानसिकतेविरोधात मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली दादर येथील भाजप कार्यालयासमोर  सोमवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी  कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीच्या प्रती जाळून भाजप-आरएसएसच्या मनुवादी विचारसरणीचा निषेध केला. जोरदार घोषणाबाजी करत जातीयवादी मानसिकतेविरोधात  संताप व्यक्त केला. (Youth Congress protests outside the BJP office in Mumbai)

यावेळी झीनत शबरीन म्हणाल्या की, काँग्रेस अध्यक्ष  खर्गे यांच्या सभेनंतर सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’ करणे ही जातीयवादी मानसिकतेची पराकाष्ठा आहे. हा केवळ  खर्गे यांचा अपमान नसून देशातील कोट्यवधी दलित, वंचित आणि शोषित नागरिकांचा अपमान आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिलेला असताना जात-पात आणि अस्पृश्यतेच्या मानसिकतेला खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींविरोधात युवक काँग्रेस सातत्याने लढा देत राहील. (Youth Congress protests outside the BJP office in Mumbai)

या आंदोलनात मुंबई युवा काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन, उपाध्यक्ष हुसैन शेख, महासचिव आसिफ खान, संतोष गुप्ता, ईशान्य मुंबई युवा काँग्रेस अध्यक्ष शेखर जगताप, दक्षिण मध्य मुंबई युवा काँग्रेस अध्यक्ष प्रज्ञा ढवळे, उत्तर मुंबई युवा काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष अजयकुमार मिश्रा, उत्तर-पश्चिम मुंबई युवा काँग्रेस अध्यक्ष शिव यादव, कार्यकारी अध्यक्ष अब्दुल समद आदी उपस्थित होते. (Youth Congress protests outside the BJP office in Mumbai)

Related posts

‘वंदे मातरम’ गात लोक फासावर चढत असताना फडणवीसांची पूर्वजांची इंग्रजांना साथ 

छात्रो को गुंज नसून झुट की गुंज ; फडणवीसांची टीका

‘कोल्हापूरचे महापौर’ पुस्तकातून पाच दशकांचा राजकीय क्षेत्राचा प्रवास