‘कोल्हापूरचे महापौर’ पुस्तकातून पाच दशकांचा राजकीय क्षेत्राचा प्रवास

'Mayors of Kolhapur'; Shahu Chhatrapati, Satish Ghatge, Appasaheb Mali.

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूरचे महापौर या पुस्तकाचे तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन खासदार शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कोल्हापूर महापौर हे पुस्तक केवळ महापौरांची ओळख घडवणारे नसून गेल्या पाच दशकांचा शहराचा सामाजिक, राजकीय क्षेत्राचा प्रवास उलगडणारी साहित्यकृती आहे असे मत मान्यवरांनी काढले. (Launch of the book ‘Mayors of Kolhapur’. Book)

माजी महापौर, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष  प्रल्हाद चव्हाण यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त जीवन गौरव पुरस्कार वितरण, निष्ठावंत पुस्तिकेचे पुर्नप्रकाशन आणि समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम झाला. खासदार शाहू महाराज हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी पत्रकार गुरुबाळ माळी, आप्पासाहेब माळी व सतिश घाटगे लिखित ‘कोल्हापूरचे महापौर’या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनही करण्यात आले. याप्रसंगी मानचिन्ह व शाल, श्रीफळ देऊन लेखकांचा सत्कार करण्यात आला. गायन समाज देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे सभागृहात हा कार्यक्रम झाला. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.  स्वर्गीय माजी महापौर  प्रल्हाद चव्हाण  प्रतिष्ठान व कोल्हापूर जिल्हा मंडप लायटिंग असोसिएशनमार्फत कार्यक्रमाजे आयोजन केले होते. (Launch of the book ‘Mayors of Kolhapur’. Book)

५५ वर्षातील ५१ महापौरांची माहिती

माजी महापौर सागर चव्हाण, स्थायी समितीचे माजी सभापती सचिन चव्हाण, नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी स्वागत केले. याप्रसंगी मान्यवरांनी पुस्तकाचे मुकतकंठाने प्रशंसा केली. ’‘कोल्हापूरचे महापौर’या पुस्तकात महापालिकेच्या ५५ वर्षातील ५१ महापौरांची एकत्रित माहिती आहे.महापालिका स्थापनेपासून ते २०२६ पर्यंतच्या महापौराचा इतिहास उलगडला आहे. पक्षीय राजकारणासोबतच महापालिकेच्या माध्यमातून शहराला लाभलेला विकासाचा चेहरा पुस्तकातून ठळकपणे मांडला आहे. महापालिकेतील राजकारण, महापौर निवडीवेळच्या घडामोडी, नगरसेवकातील कुरघोडी, नेतेमंडळीची प्रतिष्ठा या साऱ्या बाबी वस्तुनिष्ठपणे व रंजकपणे मांडल्या आहेत. यामुळे पुस्तक वाचनीय बनले आहे.’अशा भावना उपस्थितांनी केल्या.

कार्यक्रमाला आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजीव आवळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी.पाटील, उपमहापौर अक्षय जरग, ऑल इंडिया मंडप व डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष दगडूशेठ पुरोहित, उपाध्यक्ष राहूल मनोत, पश्चिम महाराष्ट्र चेअरमन सुनील माळी, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, गटनेते शारंगधर देशमुख, सभागृह नेते मुरलीधर जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान आजी माजी नगरसेवक उपस्थिती होते.  प्रल्हाद पाटील व प्रा. अशोक पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (Launch of the book ‘Mayors of Kolhapur’. Book)

Related posts

‘वंदे मातरम’ गात लोक फासावर चढत असताना फडणवीसांची पूर्वजांची इंग्रजांना साथ 

छात्रो को गुंज नसून झुट की गुंज ; फडणवीसांची टीका

युवक काँग्रेसची भाजप कार्यालयासमोर निदर्शने