Women’s Cricket : भारतीय महिलांची विजयी सलामी

Women’s Cricket

कोलंबो : फिरकीपटूंच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने तिरंगी वन-डे क्रिकेट स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात यजमान श्रीलंकेला ९ विकेटनी हरवले. श्रीलंकेचा डाव १४७ धावांत गुंडाळून भारताने हे आव्हान २९.४ षटकांमध्ये एक विकेट गमावून पूर्ण केले. (Women’s Cricket)

पावसाच्या व्यत्यय आल्यामुळे हा सामना प्रत्येकी ३९ षटकांचा खेळवण्यात आला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. कर्णधार हरमनप्रीतचा हा निर्णय भारताच्या दीप्ती शर्मा, स्नेह राणा आणि श्री चरणी या फिरकी त्रिकुटाने सार्थ ठरवला. स्नेह राणाने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, तर दीप्ती आणि श्री यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. श्रीलंकेतर्फे सलामी फलंदाज हसिनी परेराने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली. (Women’s Cricket)

श्रीलंकेचे हे माफक आव्हान पार करताना प्रतिका रावल आणि स्मृती मानधना या जोडीने भारताला पॉवर-प्लेमध्ये अर्धशतकी सलामी दिली. या ५४ धावांची भागीदारीमध्ये स्मृतीचाच वाटा ४३ धावांचा होता. तिने ४६ चेंडूंमध्ये ६ चौकारांसह ४३ धावा फटकावल्या. स्मृती बाद झाल्यानंतर प्रतिका आणि हरलीन यांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद ९५ धावांची भागीदारी रचत संघाचा विजय साकारला. प्रतिकाने ६२ चेंडूंमध्ये ७ चौकारांसह नाबाद ५० धावा केल्या. तिचे हे पदार्पणापासूनच्या सात सामन्यांमधील चौथे अर्धशतक असून तिच्या नावावर एक शतकही जमा आहे. प्रतिकाच सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. हरलीनने ७१ चेंडूंमध्ये ४ चौकारांसह नाबाद ४८ धावा केल्या. या मालिकेतील भारताचा पुढील सामना २९ एप्रिल रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. (Women’s Cricket)

संक्षिप्त धावफलक : श्रीलंका – ३८.१ षटकांत सर्वबाद १४७ (हसिनी परेरा ३०, कविशा दिलहारी २५, अनुष्का संजीवनी २२, स्नेह राणा ३-३१, दीप्ती शर्मा २-२२, श्री चरणी २-२६) पराभूत विरुद्ध भारत – २९.४ षटकांत १ बाद १४९ (प्रतिका रावल नाबाद ५०, स्मृती मानधना ४३, हरलीन देओल नाबाद ४८, इनोका रणवीरा १-३२).

हेही वाचा :

चार महिन्यांत वीस वाघांचा मृत्यू

ऑनर किलिंग, बापाने घातल्या मुलीला गोळ्या

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर