मुंबई : प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमधील पहेलगाम हल्ल्याबाबत महाराष्ट्रातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारुन पर्यटकांची हत्या केल्याचा दावा चुकीचा असल्याचे वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मुर्खपणा आहे अशी टीका केली आहे. मृतांचे नातेवाईक माफ करणार नाहीत, अशी टीका केली. (Wadettiwar)
विजय वडेट्टीवार म्हणाले, दहशतवाद्यांकडे इतका वेळ कुठे आहे की, कोणाच्या कानात जाऊन तुमचा धर्म कोणता आहे? असे विचारतील. त्यांच्या या वक्तव्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे. वडेट्टीवार म्हणाले, काही जण दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळीबार केल्याचा दावा नाकारत आहेत. दहशतवाद्यांना कोणताही जात-धर्म नसतो. या प्रकरणात दोषी असणाऱ्या व्यक्तींवर त्वरीत कारवाई करावी. या प्रकारास इतर कोणताही रंग देऊ नये, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. (Wadettiwar)
विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, पहलगाम हल्लाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. त्या ठिकाणी सुरक्षा का नव्हती? २००किलोमीटरपर्यंत दहशतवादी कसे आले? तुमच्या गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या? सुरक्षेत चूक कशी झाली? यावर विचार केला पाहिजे. या प्रकरणात दुसरीकडे लक्ष घेऊन जाणे चुकीचे आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. (Wadettiwar)
विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या वादावर बोट ठेवले आहे. महाराष्ट्रातील सरकार हे गोंधळी सरकार आहे. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यांच्या मतदारसंघात जातो आणि हिंदूत्त्व सांगतो. त्याला स्थानिक मंत्री योगेश कदम म्हणतात, की कायदा आणि सुव्यवस्था आम्हाला शिकवू नये. दोघेही मंत्री आहेत. दोघेही जबाबदार आहेत. एकीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, पाकिस्तानचा एकही नागरीक महाराष्ट्रात नाही. दुसरीकडे नगरविकास खात्याचे मंत्री म्हणतात, १०७ पाकिस्तानी सापडत नाही. इतका समन्वयाचा अभाव दिसत आहे. यावरुन हे सरकार किती गोंधळलेले हे दिसत आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. (Wadettiwar)
हेही वाचा :
लोक मरत असतील तर महामार्गांचा उपयोग काय?