विनेश फोगट रिटर्न

Vinesh Phogat returns to wrestling

नवी दिल्ली : लॉस एंजिल्स २०२८ ऑलिपिंक स्पर्धेसाठी भारताची आघाडीची आंतरराष्ट्रीय खेळाडू विनेश फोगटने कुस्तीमध्ये परत येण्याची घोषणा केली आहे. १८ महिन्यापूर्वी ऑलिपिंक स्पर्धेत काही तांत्रिक कारणामुळे तिला बाद करण्यात आल्यानंतर तिने कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा केली होती.  जुलै २०२५ मध्ये आई झालेल्या फोगट तिच्या मुलाला पुनरागमनासाठी सर्वात मोठी प्रेरणा मानत आहे.

पॅरिस ऑलिंपिकमधील झालेल्या वादानंतर विनेशने निवृत्तीची घोषणा केली होती. पॅरिस ऑलिंपिक मध्ये सुवर्णपदकाच्या अंतिम लढतीत पोहोचली होती. पण तिचे १०० ग्रॅम जास्त वजनामुळे अंतिम फेरीच्या काही तास आधी तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे ऑलिंपिक कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला होण्याची तिला संधी गमवावी लागली. (Vinesh Phogat returns to wrestling)

कुस्तीतून निवृत्ती स्वीकारल्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत ती विजयी झाली होती. ३१ वर्षीय विनेशने जुलै २०२५ मध्ये बाळाला जन्म दिला. माझे बाळ ही सर्वात मोठी प्रेरणा असून मी आता पुन्हा कुस्तीत परत आहे. २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी यापुढे ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याचा मनोदय तिने बोलून दाखवला आहे. (Vinesh Phogat returns to wrestling)

विनेश फोगटचा ऑलिपिंक प्रवास खूप अडचणीचा राहिला आहे. रिओ २०१६ ऑलिंपिकमध्ये दुखापतींना माघार घ्यावा लाग्ला आहे. टोकिओ २०२१ मध्ये लवकर बाहेर पडावे लागले होते. तर पॅरिस ऑलिंपिकमध्ये १०० ग्रॅम जास्त वजन झाल्याने तिला अपात्र ठरवण्यात आल्यानंतर देशभरातील क्रीडाप्रेमी हळहळले होते.

त्यानंतर १८ महिन्यानंतर निवृत्तीच्या निर्णयापासून ती परावृत्त झाली असून कुस्तीमध्ये तिने परतण्याचा निर्णय घेतला आहे. २०२६ च्या कॅलेंडरमध्ये एलिड कॅडरमध्ये सामील होण्यास ती सज्ज झाली आहे. (Vinesh Phogat returns to wrestling)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर