राष्ट्रवादी काँग्रेस लाचारांचा पक्ष; अर्थखात्यासाठी भीक मागितल्यासारखी मागणी

Vijay Wadettiwar criticizes the NCP over the Finance portfolio

जमीर काझी : मुंबई :  महायुतीतील  राष्ट्रवादी काँग्रेस हा लाचारांचा पक्ष झाला असून वित्त खाते पुन्हा  मिळण्यासाठी भाजपाच्या नेत्यांकडे भीक मागितल्यासारखी मागणी करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे विधान सभेचे गटनेते  विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडील अर्थ खाते आपल्याकडे ठेवले.त्याला नऊ महिन्याचा कालावधी उलटला आहे. हे खाते पुन्हा राष्ट्रवादीकडे देण्यात यावे, यासाठी पक्षाच्या प्रमुख व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह कोअर नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे वारंवार मागणी केली आहे. मात्र त्याबाबत निर्णय होत नसल्याने  सुनेत्रा पवार व अन्य नेत्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. ( Vijay Wadettiwar criticizes the NCP over the Finance portfolio)

त्याबाबत बोलताना  विजय वडेट्टीवार यांनी बोचरी टीका केली.ते म्हणाले,’ मध्यंतरी  त्यांना रोजगार  आणि इतर खात्यांचीही ऑफर देण्यात आल्याचे आपण ऐकलं आहे. अशी लाचारी यापूर्वी कधी पाहिली नाही, हायकमांडच्या मागणीशिवाय कोणीही खाते मागत नाही, असे सांगून ते म्हणाले,” पुण्यातील कंपनीच्या संदर्भात तुकाराम मुंढे यांनी घेतलेला निर्णय मंत्र्यांनी बदलल्याची माहिती ऐकिवात आहे. पक्षातील व्यक्तीला मदत करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. राजकीय संबंध असलेल्या व्यक्तींवर कारवाई होणार नाही का? राजकीय व्यक्ती नसेल तरच कारवाई केली जाणार का? राजकीय दबाव आणि हस्तक्षेपामुळे निर्णय बदलले जात असतील, तर या कारवाईकडे कोणत्या दृष्टीने पाहायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तुकाराम मुंढे ज्या पद्धतीने भूमिका घेत आहेत आणि अशा प्रकरणांमध्ये कारवाई करत आहेत, त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करावा. मुख्यमंत्र्यांनी स्थगिती उठवून ज्या ठिकाणी गोंधळ असेल, तिथं कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

दिया मिर्झाची पोस्ट हटविणे हा तर वेड्यांचा बाजार

अभिनेत्री दिया मिर्झाने फटाक्यांच्या वापराबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले होते.  ‘माय मुंबई ‘ ऍपवर  व्हिडिओ पोस्ट केला  होता. मात्र भाजपाचे आमदार अमित साटम विरोध केल्यानंतर बीएमसीने तो हटविल्याने सोशल मीडियावर टीकेची झोड उठत आहे. त्याबाबत वडेट्टीवार म्हणाले की, ” हा वेड्यांचा बाजार सुरू आहे. संविधानाची शपथ घेतली जाते आणि दुसरीकडे हिंदू-मुस्लिम यांच्यात फूट पाडण्यासाठी दुकानं उघडली जात आहेत. अशा प्रकारच्या गोष्टी चालत नाहीत, त्यामुळेच अशा प्रकारचे धंदे केले जात आहेत”.

  ‘भाजपाच्या नेत्यांनी अशा कॉम्प्युटर बाबांच्या पाया पडावे’

काल एका मंत्र्याने कॉम्प्युटर बाबांच्या पाया पडल्याचे पाहायला मिळाले. रोज टीव्हीवर वेगवेगळे बाबा पाहायला मिळत आहेत. आता साडेपाचशे बाबा तयार झाले आहेत. हा प्रकार आता थांबवला पाहिजे. भाजपाच्या नेत्यांनी अशा बाबांच्या पाया पडावे, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. मात्र दुसरीकडे काल सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बोगस बाबांच्या कृपेनं शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? अशी विचारणा केली. ( Vijay Wadettiwar criticizes the NCP over the Finance portfolio)

शेतकऱ्यांना पाच हजाराची मदत कधी ?’ 

‘शेतकऱ्यांना पाच हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. मदतीसाठी अनेक अटी आणि शर्ती लावण्यात आल्या आहेत. त्यात ३३ टक्के उत्पादन घटल्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचणार आहे? राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. याला सरकार जबाबदार आहे. केवळ घोषणा केल्या जात आहेत. दिवाळीसारखा सण आला, तरी शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कुंभमेळ्यात  ध्वजारोहणासाठी कोट्यवधीचा खर्च कोणासाठी?

नाशिक येथील कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण कार्यक्रमात झालेल्या  कोट्यवधीच्या खर्चाबाबत ते म्हणाले, “मला हिंदूविरोधी म्हणा किंवा कुंभमेळाविरोधी म्हणा. मात्र शेतकरी आत्महत्या करत आहेत, ते हिंदू नाहीत का? बोलताना थोडे भान ठेवले पाहिजे. आत्महत्या करणारा शेतकरी हिंदू नाही का? मग कोणासाठी धर्म जोपासत आहात? शेतकरी आत्महत्या करत असताना तुम्ही नौटंकी आणि नाटक करण्यात व्यस्त आहात.  ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावर तब्बल १६ खर्च करण्यात आले आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्राला लुटलं जात आहे. धर्माच्या नावाखाली महाराष्ट्राची लूट सुरू आहे. ही रक्कम जिल्ह्यांच्या विकासासाठी द्यायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. ( Vijay Wadettiwar criticizes the NCP over the Finance portfolio)

Related posts

गोकुळमध्ये मतचोरी; राहूल गांधीची भाजपवर टीका

गोकुळ’मध्ये सत्तांतर रोखण्यासाठी  आणलेला अध्यादेश बेकायदेशीर

एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये दिवाळी भेट : प्रताप सरनाईक