VHP Nationwide Campaign : विहिंपचा हिंदुत्वाचा राष्ट्रव्यापी जागर १६ ऑगस्टपासून

VHP Nationwide Campaign

लखनौ : हिंदुत्वाचा राष्ट्रव्यापी जागर करण्यासाठी विश्व हिंदू परिषदे (विहिंप)च्यावतीने १६ ऑगस्टपासून मोहीम आयोजित केली आहे. हिंदुत्वाच्या जागराबरोबरच सांस्कृतिक ऐक्याला प्रोत्साहन देण्यासाठी विहिंप ही ९ दिवसांची मोहीम राबवणार आहे. (VHP Nationwide Campaign)

विश्व हिंदू परिषदेच्या ६१ व्या स्थापना दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याची तयारी सुरू आहे. या मोहिमेत सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि देशभरात हिंदुत्व मूल्यांचा प्रसार यावर भर दिला जाईल.

मोहिमेचा एक भाग म्हणून संपूर्ण भारतात १ लाखाहून अधिक ठिकाणी उपक्रमांचे नियोजन केले आहे. सत्संग, धार्मिक प्रवचन, प्रभातफेरी आणि भव्य मिरवणुकांसारख्या आध्यात्मिक मेळाव्यांचा समावेश असेल. जवळजवळ ९०,००० स्थानिक समित्या या कार्यक्रमांचे समन्वय करणार आहेत. (VHP Nationwide Campaign)

शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना, विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल म्हणाले की, सामायिक सांस्कृतिक मूल्यांद्वारे हिंदू समुदायाला एकत्र आणणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. ‘‘महानगरापासून ते वाड्या वस्त्यांपर्यंत विहिंपचे काम पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे,’’ असे ते म्हणाले. (VHP Nationwide Campaign)

उत्तर प्रदेशात अयोध्या, काशी (वाराणसी) आणि मथुरा या धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांसह ८,००० हून अधिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखण्यात येत आहे.

बंसल यांनी असेही सांगितले की या मोहिमेचा प्रसार हिंदू मंदिरांच्या पलीकडे जाऊन बौद्ध स्तूप , जैन मंदिरे आणि शीख गुरुद्वारांपर्यंत विस्तारेल. रविदासिया आणि वाल्मिकी दलित गटांसारखे समुदाय देखील सक्रियपणे सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

या मोहिमेचा मुख्य उद्देश लोकांना धर्मांतर, लव्ह जिहादबद्दल सजग करणे हा आहे. त्याच वेळी, हा उपक्रम जात आणि भाषिक विभाजनांच्या पलीकडे जाऊन सामाजिक एकता दृढ करण्याचा प्रयत्न आहे.

Related posts

कॉक्रोच जनता पार्टीचा पहिला शो फ्लॉप का झाला?

निवडणूक पैशांच्या जोरावर, ईडीची भिती दाखवून लढू नये: सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका

जंतरमंतर वर कॉक्रोच जनता पार्टी कडून धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी