मुंबई : वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर ती आणि तिच्या कुटुंबीयांचे आर्थिक शोषण किती वेगवेगळ्या पद्धतीने केले गेले, याची माहिती समोर येत आहे. वैष्णवीच्या लग्नात दीड लाखाचा रूखवत दिल्याची माहिती खुद्द वैष्णवीच्या वडिलांनीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांना दिली आहे. (Vaishnavi death)
दमानिया यांनी तशी पोस्टही ‘एक्स’वर केली आहे.
‘‘हा घ्या एक मोठा पुरावा.
वैष्णवीच्या वडिलांकडून १००००० रुपये पूनम जालिंदर सुपेकर यांच्या नावाने घेतले.
तुम्ही रुखवत नका करू, मामी (पूनम जालिंदर सुपेकर) सुंदर रूखवत करतील असे सांगून १ लाखाचा चेक आणि ५०,००० रोख हे हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या महेच्यांकडून वसूल केले.(Vaishnavi death)
दूरच्या नातलगांना कोणी पैसे द्यायला सांगतात का?,’’ असे दमानिया यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात हगवणे कुटुंबाशी काही संबंध नसल्याने सांगणाऱ्या आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावर पुराव्यानिशी आणखी एक आरोप करण्यात आला आहे.
वैष्णवीच्या लग्नातील रुखवत शशांक हगवणेची मामी अर्थात जालिंदर सुपेकरांच्या बायकोनेच बनवल्याचे कस्पस्टेंनी सांगितल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रुखवत आमच्या पाहुण्या सुपेकरांकडून रुखवत बनवून घ्या असे वैष्णवीची सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणेंनी कस्पटेंना सांगितले होते. त्यांच्या सांगण्यावरुनच सुपेकरांच्या बायकोला रुखवताची ऑर्डर देण्यात आल्याचं कस्पटेंनी म्हटले आहे. रुखवताचे एक लाख रुपये चेक द्वारे तर ५० हजारांची रोख रक्कम दिल्याचे वैष्णवीच्या वडिलांनी म्हटले आहे. वैष्णवीच्या आईच्या अकाउंटवरुन पेमेंट केल्याचा खुलासाही कस्पटेंनी केला आहे.(Vaishnavi death)
प्रकरण सुपेकरांना भोवले
आता हे प्रकरण आयपीएस सुपेकर यांच्या चांगलेच अंगाशी आल्याचे दिसत आहे. जालिंदर सुपेकरांची उपमहासमादेशक होमगार्ड या पदावर बदली करण्यात आली आहे. त्या आधी जालिंदर सुपेकर हे विशेष पोलिस महानिरिक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावर कार्यरत होते. तिथून त्यांची पदावनती उप महासमादेशक होमगार्ड या पदावर केल्याचे गृह विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.(Vaishnavi death)
निलेश चव्हाणला पोलिस कोठडी नेपाळहून अटक केलेल्या निलेश चव्हाणला कोर्टाने ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वैष्णवीच्या मुलाची हेळसांड करण्यासह तिच्या माहेरच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तो फरार झाला होता. त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
हेही वाचा :
पुण्यातील लॉ स्टुडंटला अटक
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान बनावट बातम्यांना तोंड देण्यात वेळ वाया : सीडीएस