Uttam Kumar Reddy: राफेल विमान पाडल्याचे सरकारने नाकारू नये : काँग्रेस नेते रेड्डी

Uttam Kumar Reddy

नवी दिल्ली : पाकिस्तानने आपले राफेल विमान पाडले हे सत्य मोदी सरकारने नाकारू नये, असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते आणि तेलंगणाचे मंत्री उत्तम कुमार रेड्डी यांनी शनिवारी (३१ मे) केला. (Uttam Kumar Reddy)

संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या वक्तव्याचा आधार घेत रेड्डी यांनी मोदी सरकारवर टीकास्र सोडले.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानशी झालेल्या संघर्षात हवाई हल्ल्याच्या पहिल्या दिवशी भारताचे नुकसान झाल्याची कबुली संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी दिली. त्यानंतर काँग्रेसने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली.(Uttam Kumar Reddy)

पत्रकार परिषदेत उत्तम कुमार रेड्डी म्हणाले, ‘‘चार दिवसांच्या युद्धात आपण विजय मिळवला. परंतु हे स्पष्ट दिसते की चार दिवसांच्या ऑपरेशनमध्ये राफेल लढाऊ विमान पाडले गेले. आणि जेव्हा राहुल गांधींनी पहिल्यांदा परराष्ट्रमंत्र्यांना प्रश्न म्हणून हे निदर्शनास आणून दिले तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या सर्व स्तरातील कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर देशभक्त नसल्याचा आरोप करणे खूप विचित्र होते.’’

ते म्हणाले, ‘‘आज, सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी भारताचे पहिल्या दिवशी नुकसान झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. डीजीएमओ ब्रीफिंगमध्ये एअर मार्शल भारती यांनी नेमके काय म्हटले ते मी येथे उद्धृत केले पाहिजे. त्यांनी सांगितले की युद्धात नुकसान होणे सामान्य आहे. संपूर्ण ऑपरेशनचे उद्दिष्ट साध्य झाले आहे, परंतु सर्व वैमानिक घरी परतले आहेत. आम्हाला याबद्दल खूप आनंद आहे – उद्दिष्ट साध्य झाले आहेत आणि सर्व वैमानिक घरी परतले आहेत.’’(Uttam Kumar Reddy)

पण लढाऊ विमान खाली पडले ही वस्तुस्थिती सांगण्याची गरज आहे. आता सीडीएस चौहान यांनी स्वतः याचा उल्लेख केला आहे आणि अप्रत्यक्षपणे एअर मार्शल भारती यांनी डीजीएमओसमवेत त्यांच्या ब्रीफिंगमध्ये याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे भारत सरकारने ते नाकारणे थांबवावे,” असे ते पुढे म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस नेते पवन खेरा यांनी, “पहेलगाम हल्ल्यातील दहशतवादी कधी पकडले जाणार, पुलवामामध्ये आरडीएक्स कोणी विकत घेतले आणि पाकिस्तानशी युद्धबंदीच्या अटी काय होत्या?, असे सवाल मोदी सरकारला केले. या प्रश्नांची आम्हाला स्पष्ट उत्तरे हवी आहेत,” असे खेरा म्हणाले. “कोणाच्या दबावाखाली युद्धबंदी करण्यात आली? पहेलगाममध्ये पती गमावलेल्या महिलेला न्याय मिळाला का… यातून (ऑपरेशन सिंदूर) काय धडे मिळाले आणि सीडीएसने असेही म्हटले की यातून धडा घेणे महत्त्वाचे आहे. आता, किमान भाजप प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही म्हणू शकणार नाही,” असे ते पुढे म्हणाले.

हेही वाचा :
सुरूवातीला भारताचे हवाई हल्ल्यात नुकसान : सीडीएस
घोडबंदर प्रकल्पात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार : सपकाळ

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर