फिफा वर्ल्डकप मॅच दिवशी शाळा बंद

Schools closed for the football match

नवी दिल्ली : फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेस उद्या ११ जून रोजी प्रारंभ होत आहे. स्पर्धेचे उद्घाटन मेक्सिको सिटीमध्ये होणार असून मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता घेऊन मेक्सिकन सरकारने शाळा बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. तसेच वर्क फ्रॉम होम चे आवाहन नोकरदरांना करण्यात आला आहे. जगभरातील फुटबॉल शौकिन फिफा विश्वचषक स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी उत्सुक आहेत.  (Schools closed for the football match)

स्पर्धेचा पहिला सामना गुरुवारी ११ जून रोजी मेक्सिको सिटी स्टेडियमवर यजमान मेक्सिको आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात खेळवला जाणार आहे. भारतात हा सामना गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता पहायला मिळणार आहे. उद्घाटनाच्या सामन्याला मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेची कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मेक्सिको सरकारने काही आदेश काढले आहेत. बालवाडीपासून विद्यापीठ स्तरापर्यंतच्या सर्व शैक्षणिक संस्थातील सार्वजनिक आणि खासगी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सरकारने खासगी कर्मचाऱ्यांनाही घरुन काम करण्याची परवानगी दिली आहे. (Schools closed for the football match)

अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा हे तीन देश स्पर्धेचे यजमानपद सांभाळत आहेत. स्पर्धेत ४८ देशातील १२४८ खेळाडू सहभागी होणार आहेत. भारतातही फुटबॉलची लोकप्रियता वाढत असून मुंबई, कोल्हापूर या शहरासह गोवा, केरळ, पश्चिम बंगाल, ईशान्यपूर्व राज्यांमध्ये फुटबॉल खेळ अतिशय लोकप्रिय आहे. पुढील सव्वा महिने जगभरातीतील दिग्गज संघांचे सामने पाहण्याची पर्वणी मिळणार आहे. (Schools closed for the football match)

Related posts

काँग्रेसची निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने

नेहरुंची मोदीशी तुलनाच होऊ शकत नाही

इराणचा अमेरिकेच्या २१ लष्करी तळांवर हल्ला