उपनिषदे आणि धर्मशास्त्रांतील ब्राह्मण

Upanishads and Brahmanas

उपनिषदांमध्ये ‘ब्राह्मण‘ हा शब्द अंतर्निहित आत्मसाक्षात्काराशी (inner realisation) संबंधित आहे. धर्मशास्त्रात मात्र ‘ब्राह्मण’ हा शब्द जन्माधारित स्थान आणि शुद्धतेशी जोडलेला आहे.

सुरुवातीच्या उपनिषदांची रचना इसवी सन पूर्व ६०० ते इसवी सन पूर्व २०० दरम्यान झाली, तर सुरुवातीच्या धर्मशास्त्रांची रचना इसवी सन पूर्व २०० ते इसवी सन ५०० या काळात झाली. यातील पहिली संकल्पना (उपनिषदे) अधिक आध्यात्मिक आहे, तर दुसरी (धर्मशास्त्रे) अधिक कायदेशीर स्वरूपाची आहे. (
Upanishads and Brahmanas)

देवदत्त पटनायक 

विवाहाचे कडक नियम उपनिषदांमध्ये नाहीत

. जातीवर आधारित विवाहाचे कडक नियम धर्मशास्त्रांमधे सांगितले आहेत. हा विचार उपनिषदांमध्ये आढळत नाही. वास्तविक पाहता, जनुकीय अभ्यासांनुसार (genetic studies), भारतात एकाच जातीत विवाह करण्याची पद्धत (endogamy) केवळ १९०० वर्षांपूर्वी (७० पिढ्यांपूर्वी) सुरू झाली; हा नाट्यमय सामाजिक बदल वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाला आहे. या बदलाने हिंदू धर्माला कायमचे बदलून टाकले. हुणांच्या आक्रमणांमुळे आणि बौद्ध व जैन धर्माला मिळालेल्या राजाश्रयामुळे त्यांना उत्तर भारत सोडणे भाग पडले. हिंदू धर्माचे हेच नवीन रूप ब्राह्मणांनी आर्यावर्ताच्या पलीकडे दक्षिण आणि पूर्व भारताच्या नदीखोऱ्यांमध्ये नेले.(Upanishads and Brahmanas)

केवळ एक खरा ब्राह्मणच

छांदोग्य उपनिषदात, ‘सत्यकाम’ नावाचा एक मुलगा गौतम ऋषींकडे जातो आणि आपल्याला विद्यार्थी म्हणून स्वीकारण्याची विनंती करतो. गौतम त्याला त्याच्या वंशाबद्दल विचारतात. सत्यकाम त्याच्या आईने जे सांगितले होते तेच प्रामाणिकपणे सांगतो: तिच्या आयुष्यात अनेक पुरुष (प्रेमी) आल्यामुळे त्याला त्याचे वडील कोण आहेत हे ठाऊक नाही. त्यावर गौतम ऋषी उद्गारतात: केवळ एक खरा ब्राह्मणच असे तडजोड न करणारे सत्य बोलू शकतो. ते त्या मुलाला आपला शिष्य म्हणून स्वीकारतात. या ठिकाणी वंश नव्हे, तर सत्यप्रियता ही ब्राह्मणत्वाची ओळख ठरते. (Upanishads and Brahmanas)

‘रैक्व’ नावाचा एक सामान्य गाडीवान, पैशाच्या बदल्यात राजा जनश्रुतीला उपनिषदांचे रहस्य सांगण्यास नकार देतो. मात्र, जेव्हा राजा आपल्या मुलीचा विवाह त्याच्याशी करण्याचा प्रस्ताव ठेवतो, आणि जात आणि वर्ग या विषयीच्या पूर्वग्रहांवर मात करून त्याला कुटुंबाचा सदस्य म्हणून स्वीकारतो—तेव्हा ते ज्ञान प्रकट केले जाते.

मनुस्मृतीमध्ये ब्राह्म्णाची व्याख्या जन्मावरुन

धर्मशास्त्राचे जग पूर्णपणे वेगळे आहे. मनुस्मृतीमध्ये ब्राह्मणाची व्याख्या विशिष्ट वर्णात झालेल्या जन्मावरून केली जाते. त्यांची कर्तव्ये निश्चित केली आहेत: वेदांचा अभ्यास करणे आणि ते शिकवणे, यज्ञ करणे आणि ते करवून घेणे, दान स्वीकारणे आणि दान देणे. विवाहसंबंध, अन्नावरील निर्बंध, वारसाहक्क आणि शिक्षा यांवर तपशीलवार नियम नियंत्रण ठेवतात. जर एखाद्या ब्राह्मणाने गुन्हा केला, तर त्याच गुन्ह्यासाठी शूद्राला मिळणाऱ्या शिक्षेपेक्षा ब्राह्मणाची शिक्षा सौम्य असू शकते. येथील सामाजिक व्यवस्था ही श्रेणीबद्ध विषमतेवर आधारित आहे.

या कायदेशीर चौकटीचे दर्शन घडवणाऱ्या अनेक कथा आहेत. रामायण परंपरेतील ‘शंबुका’ची कथा दाखवते की एक शूद्र अशा तपाचरण करत आहे. तपाचरण केवळ उच्च वर्णीयांसाठी राखीव होते. शंबुकाचे तप वैश्विक व्यवस्थेचे उल्लंघन मानले जाते. राजा हिंसकपणे हस्तक्षेप करतो आणि धर्मरक्षण करण्यासाठी शंबुकाचा वध करतो. येथे धर्म हा आंतरिक शोधाशी नव्हे, तर ठराविक सामाजिक भूमिकांशी जोडलेला आहे.

कृष्णाची ओळख गोपाळ….

त्याचप्रमाणे, अनेक स्मृतींमधील संवादांमध्ये, आंतरजातीय विवाहांतून जन्माला आलेल्या अपत्यांच्या वेगवेगळ्या श्रेणी निश्चित केल्या गेल्या आहेत आणि प्रत्येकाला विशिष्ट व्यवसाय वाटून दिले आहेत. येथे माणसाची ओळख ही नियंत्रित वंशपरंपरेचा विषय बनते. यात ‘ब्रह्म’ प्राप्त करण्याची चिंता नसून, उच्च-नीचतेची उतरंड टिकवून ठेवण्याची काळजी दिसते. कृष्ण हा नेहमी गोपाळांनी सांभाळल्यामुळे गोपाळ (गवळी) म्हणून ओळखला जातो. कर्णाचा सांभाळ सुताने (सारथी) केल्यामुळे तो नेहमी सूतपुत्र म्हणूनच ओळखला जातो. कर्ण हा खालच्या जातीचा असल्यामुळे द्रौपदी त्याच्याशी लग्न करण्यास नकार देते. भक्ती साहित्यात, अशुद्ध मानल्या गेलेल्या संतांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. संपूर्ण भारतात, जगन्नाथ पुरी आणि पंढरपूर यांसारख्या मंदिरांच्या प्रवेशद्वारांवर अशी मंदिरे (किंवा स्मारके) आहेत जी प्रत्येकाला त्या लोकांची आठवण करून देतात ज्यांना अशुद्ध जन्माच्या कारणावरून मंदिरात प्रवेश दिला गेला नव्हता.


हिंदू धर्माच्या श्रेष्ठत्वासाठी उपनिषदांचे दाखले


उपनिषदांची कल्पनाशक्ती ही सत्य आणि अंतर्दृष्टी अंगी बाणवणाऱ्या कोणासाठीही ब्राह्मणत्वाचे दरवाजे उघडे करते. तर धर्मशास्त्राची कल्पनाशक्ती त्याला जन्म, नियम आणि विशेषाधिकारांच्या चौकटीत बंदिस्त करते. एकीकडे अशा शोधकांची कथा सांगितली जाते जे सामाजिक स्थानाच्या पलीकडे जातात; तर दुसरीकडे सामाजिक स्थान ओलांडले गेल्यास व्यवस्था धोक्यात आल्याची कथा सांगितली जाते.

२१ व्या शतकात, हिंदू लोक आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी उपनिषदांचे दाखले देतात, परंतु त्यांचे सामाजिक वर्तन मात्र धर्मशास्त्राशी सुसंगत असते. आज सोशल मीडिया अशा लोकप्रिय गुरूंनी भरलेला आहे जे ब्राह्मण जन्माच्या वैभवाबद्दल बोलतात. हे अत्यंत दुर्दैवी आहे. (Upanishads and Brahmanas)

Related posts

सोमरस म्हणजे नेमके काय ?

राजर्षी शाहू महाराजः क्रांतिकारक लोकराजा 

मेस्सीः आमच्या स्वप्नभूमीचा नागरिक