मुंबई : प्रतिनिधी : मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू झाला. पालघरमधील जुना पालघर येथील जैन मंदिर, गांधीनगर परिसरातील रेल्वे ट्रॅकवर हा अपघात शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. स्वप्निल शैलश पालांडे (वय २३), कुणाल कुमार दुबला (२३) आणि अफरोज खलील शेख (२८) अशी मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. (Three Youths Killed After Being Struck by Freight Train)
या अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सिव्हिल ड्रेसमधील काही पोलिस या तिघांच्या मागे लागले होते. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केल्यावर ते घाबरुन पळत असताना ते मालवाहू रेल्वे ट्रॅकवर गेले. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या मालगाडीची धडक तिघांचा मृत्यू झाला असे नातेवाईकांची म्हणणे आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी मृतांच्या कुटुंबियांनी केली. (Three Youths Killed After Being Struck by Freight Train)