बेळगाव : प्रतिनिधी : पोहायला शिकायला गेलेल्या तीन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावात ही घटना घडली.(Three children drowned)
पृथ्वीराज केरबा (वय १३), अथर्व सौंदलगे (१५) आणि समर्थ गडकरी (१३) अशी बुडून मृत झालेल्या मुलांची नावे आहेत. हे तिघेही इंगळी गावातील आहेत. (Three children drowned)
सध्या शाळेला सुट्टी असल्याने ते शेततळ्यात पोहायला शिकण्यासाठी गेले होते. ही तीनही मुले सायकली घेऊन गावाबाहेरील शेततळ्यात पोहायला शिकण्यासाठी गेले. तिघांनाही पोहता येत नव्हते अशी माहिती मिळाली आहे. शेताचा मालक शेतात आला असताना त्याला शेततळ्याजवळ एक सायकल दिसली. त्याने शेततळ्यात पाहिले असता तिन्ही मुलांचे मृतदेह आढळले. घटनास्थळी चिकोडी तहसीलदार चिदंबर कुलकर्णी, अंकली पोलिस ठाण्याचे पीएसआय नंदेश यांनी भेट दिली. या प्रकरणी अंकली पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा :
कर्नाटकचा मंत्री म्हणाला, मी युद्धावर जातो…
गोव्यात चेंगराचेंगरी; सहाजणांचा मृत्यू