मुंबई : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या केवळ ९० टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. या शक्यतेने मान्सूनवर अवलंबून असणाऱ्या पिकांवर मोठा परिणाम होणार आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, आणि तामिळनाडूतील काही भागांना फटका बसू शकतो. आधीच आखाती युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असताना कमी पावसाचा अंदाज वर्तवल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. (This year, rainfall across the country is below average)
पावसावर अवलंबून असलेल्या मान्सून कोअर झोनमध्येही पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याचा परिणाम शेतीवर होणार असून जलसाठे, वीज निर्मितीवर परिणाम होणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य भारत, दक्षिण द्वीपकल्प आणि उत्तर-पश्चिम भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. ईशान्य भारतात मात्र तुलनेने सामान्य पावसाची शक्यता वर्तवली आहे. देशातील बहुतांश भागात जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता वर्तवली आहे. काही मोजक्या भागातच सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवला आहे. (This year, rainfall across the country is below average)
जूनमध्ये देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याच् शक्यता वर्तवली आहे. उत्तर पश्चिम भारत, ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील काही भाग वगळता कमी पावसाचे संकेत आहेत. (This year, rainfall across the country is below average)