शेअर बाजार ९० हजारांपर्यंत जाणार

मुंबई  : वृत्तसंस्था : ग्लोबल ब्रोकरेज फर्म ‘एचएसबीसी’ने भारताबाबतच्या रणनीतीवर नवीन नोट जारी करताना ओव्हरवेट आउटलुकसह सकारात्मक भूमिका कायम ठेवली आहे. अहवालानुसार, २०२५ च्या अखेरीस सेन्सेक्स ९० हजार ५२० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे १५ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.

‘एचएसबीसी’ने यापूर्वी १,००,०८० हे लक्ष्य ठेवले होते. भारताचा आर्थिक विकास जरी थोडा मंदावला असला, तरी तो अजूनही मजबूत स्थितीत आहे. तथापि, इक्विटी मार्केटमध्ये काही आव्हाने आणि जोखीम कायम आहेत. मिडकॅप-स्मॉलकॅप किंवा लार्जकॅप ब्रोकरेज फर्मने सांगितले, की भारताची स्थिर वाढ असूनही, अधिक स्मॉलकॅप आणि मिडकॅप समभागांमध्ये प्रति शेअर सर्वाधिक कमाई (ईपीएस) वाढ दिसून येत आहे. व्यापक बाजारपेठेतील या कंपन्यांमध्ये ३० टक्के दराने वाढ अपेक्षित आहे. याउलट, लार्ज कॅप स्टॉकसाठी हा वाढीचा दर १२ टक्के असण्याचा अंदाज आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना लार्ज कॅप समभागांमध्ये सर्वाधिक रस आहे, ज्यांची वाढ आता मंद होत आहे.

‘ब्रोकरेज फर्म’च्या विश्लेषकांचा असा विश्वास आहे, की मंदी असूनही, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. या नोटमध्ये २०२५ साठी आशियातील सर्वाधिक पसंतीच्या स्टॉकची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत फक्त दोन भारतीय समभाग ॲक्सिस बँक आणि किम्स समाविष्ट आहेत. नोटमध्ये म्हटले आहे, की ‘किम्स’ला कॅपेक्स अपसायकल आणि भारतातील आरोग्य सेवांमध्ये वाढती मागणी यांचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. ॲक्सिस बँकेचे मूल्यांकन आकर्षक दिसते. कंपनी देशाच्या आर्थिक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी एक मजबूत पर्याय म्हणून उदयास येत आहे.

जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असूनही, भारतीय बाजारपेठेबाबत काही धोके आहेत. नोटमध्ये म्हटले आहे, की उच्च कमाई मल्टिपल धोका असल्याचे सिद्ध होऊ शकते. कमाईच्या वाढीवर आणखी दबाव असल्यास, गुंतवणूकदार त्यांच्या स्थितीचे पुनर्मूल्यांकन करतील. अल्पावधीत इक्विटी मार्केटशी संबंधित जोखीम बाजाराच्या कामगिरीवर परिणाम करू शकतात; परंतु दीर्घकालीन दृष्टिकोन सकारात्मक राहतो.

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ