कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचा ४, भाजप ३,राष्ट्रवादी, काँग्रेस, जनसुराज्य चा प्रत्येकी २ नगरपालिकेवर झेंडा

The Shiv Sena Shinde group has hoisted its flag on four municipalities

कोल्हापूर : प्रतिनिधी:  कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला असून भाजपने चंदगड, आजरा आणि हुपरी नगरपरिषदेवर झेंडा लावला. हातकणंगले, शिरोळ, जयसिंगपूर आणि मुरगुडमध्ये  शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली. कागल आणि गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने, काँग्रेसने वडगाव आणि शिरोळमध्ये तर जनसुराज्य शक्ती पक्षाने दोन नगरपालिकेवर विजय मिळवला.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कागल नगरपालिका आणि सर्वात मोठी नगरपालिकेवर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने मोठ्या फरकाने विजय मिळवला. मलकापूर आणि पन्हाळा नगरपरिषदेवर जनसुराज्य शक्ती, भाजप आघाडीने विजय संपादन केला. शिरोळ नगरपालिकेत गणपतराव पाटील आणि अनिल यादव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मोठा विजय संपादन केला. आमदार अशोकराव माने यांच्या स्नुषा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तर त्यांचा मुलगाही नगरसेवकपदाच्या निवडणूकीत पराभूत झाले. आमदार माने यांची जबरदस्त पिछेहाट झाली आहे. जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर विजयी झाले. (The Shiv Sena Shinde group has hoisted its flag on four municipalities)

कागलमध्ये मश्रीफ घाटगे गटाची बाजी

संपूर्ण राज्याच्या लक्ष लागलेल्या कागल नगरपालिकेत मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे गटाच्या उमेदवार सविता प्रताप माने या विजयी झाल्या. या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत. तसेच मंत्री मुश्रीफ आणि समरजीत घाटगे हे कट्टर वैरी एकत्र आले आहेत.

मुरगुड नगरपालिकेत शिवसेनेने खाते खोलले

कोल्हापूर जिल्ह्यात पहिला निकाल आला असून शिवसेना शिंदे गटाच्या सुहासिनी प्रविणसिंह पाटील या नगराध्यक्षपदासाठी निवडून आल्या आहेत. या ठिकाणी भाजप आणि शिवसेना पक्षाची युती असून शिवसेनेचे माजी खासदार संजयसिंह मंडलिक, माजी आमदार संजयसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढण्यात आली. या ठिकाणी मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुरगडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार हे पराभूत झाले आहेत. गेल्यावेळी ते शिवसेनेचे नगराध्यक्ष होते. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यांच्या पत्नीही नगरसेवक पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. भाजप शिवसेना युतीचे १६ उमेदवार विजयी झाले असून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना केवळ चार जागा मिळाल्या आहेत.

पन्हाळ्यात जनसुराज्य चा गुलाल

पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जयश्री प्रकाश पवार नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. ही नगरपरिषद जनसुराज्य पक्षाचा बालोकिल्ला आहे. निवडणूकीपूर्वी २० पैकी सहा जागा बिनविरोध निवड झाली होती. १६ जागांवर जनसुराज्य, भाजप आणि स्थानिक आघाडीचे उमेदवार विजयी झाली आहेत. (The Shiv Sena Shinde group has hoisted its flag on four municipalities)

मलकापुरात रश्मी कोठावळे विजयी

शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेत जनसुराज्य शक्ती आणि भाजप युतीच्या रश्मी कोठावळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ४८५ मतांनी विजयी झाल्या आहेत. कोठावळे यांना २२६५ मते मिळाली. विजयी उमेदवारांना मिळालेली मते अशी, वार्ड १ अ – निलम किरण लगरे – जन सुराज्य शक्ती (२२७), ब – दिलीप आनंदा पाटील – जन सुराज्य शक्ती (२४९). वार्ड २ अ – संजय बळवंत मोरे – शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे – (१७१) ब – सुरेखा विलास घाडगे – शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे – (२२७).  वार्ड ३ अ – अभिजीत दिलीप गुरुव – शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे – (१६८), ब – भाग्यश्री प्रदिप पवार – शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे – (११३). वार्ड ४ अ – पल्लवी सुरेश पवार – शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे – (१७४) ब – महेंद्र मनोहर कोठावळे – भारतीय जनता पार्टी – (१४५).  वार्ड ५ अ – ओमकार संभाजी भोपळे – जन सुराज्य शक्ती (३६५),  ब – गीता बाबासाहेब पाटील – जन सुराज्य शक्ती (२८४).  वार्ड ६ अ – सुरेखा दिलीप कांबळे – जन सुराज्य शक्ती (२९२),  ब – रमेश बाबु चांदणे – जन सुराज्य शक्ती (२५९).  वार्ड ७ अ – किरण चंद्रकांत घेवडे – जन सुराज्य शक्ती (३२६),  ब – पुजा निलेश चव्हाण – शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे (१९०).  वार्ड ८ अ – साक्षी शैलेश गणेश – जन सुराज्य शक्ती (२६५),  ब – अमोल मधुकर केसरकर – बिनविरोध- जन सुराज्य शक्ती.  वार्ड ९ अ – गिरीजा ऊर्फ दिपाली प्रतापसिंग कोकरेदेसाई – जन सुराज्य शक्ती (२५६), ब – खंडेराव हणमंत पळसे – जन सुराज्य शक्ती (१९८). वार्ड १० अ – नेहा इंद्रनिल बेर्डे – शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे – (१९०),  ब – रविराज नानासो कोकरेदेसाई – अपक्ष (३१४). (The Shiv Sena Shinde group has hoisted its flag on four municipalities)

हातकणंगलेत शिवसेनेची पाटिलकी

हातकणंगले नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजित पाटील मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाला सहा, काँग्रेसला पाच, शिवसेना ठाकरे गटाला एक, भाजपला दोन तर तीन अपक्ष निवडून आले आहेत.

चंदगडमध्ये भाजपचे कमळ फुलले

चंदगड नगरपरिषद निवडणूकीत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनील काणेकर विजयी झाले. नगरपालिकेत भाजपचे आठ गरसेवक निवडून आले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँगेस व मित्रपक्ष राजर्षी शाह आघाडी आठ जागावर विजयी झाले आहेत. एक अपक्ष उमेदवार विजय झाला आहे.

शिरोळमध्ये काँग्रेसचा मोठा विजय, आमदारांच्या स्नुषा, मुलगा पराभूत

शिरोळ नगरपालिका निवडणूक हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अशोकराव माने आणि शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मोठा धक्का बसला आहे. अशोकराव माने यांच्या सुनबाई भाजप ताराराणी आघाडीच्या उमेदवार सारिका अरविंद माने या पराभूत झाल्या आहेत. आमदाराचे पुत्र अरविंद माने हेही नगरसेवकपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. दत्त सहकारी साखर कारखान्याचे काँग्रेसचे गणपतराव पाटील आणि अनिल यादव यांच्या गटाने वर्चस्व मिळवले आहे. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या योगिता कांबळे विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक एक मधून पृथ्वीराजसिंह यादव (यादव गट),  विदुला यादव (यादव गट), प्रभाग क्रमांक २ मधून  अनिता संकपाळ (यादव गट), उल्हास आवळे (यादव गट), प्रभाग क्रमांक ३ मधून  राहुल कोळी (यादव गट), शिवानी कांबळे (भैय्या गट), प्रभाग क्रमांक ४ मधून  विजय आरगे (यादव गट), श्वेता जाधव (अपक्ष), प्रभाग क्रमांक ५ अमर शिंदे (भैय्या गट), सविता पुजारी (यादव गट), प्रभाग क्रमांक ६  शाहूल कोळी (अपक्ष),  रेखा कोरे (यादव गट), प्रभाग क्रमांक ७  शरद मोरे (बापू) (यादव गट),  दिपाली फल्ले (यादव गट), प्रभाग क्रमांक ८ मधून  कल्पना काळे (यादव गट), दिपक भाट (यादव गट), प्रभाग क्रमांक ९  अमरसिंह पाटील (भैय्या) (भैय्या गट),  अनुराधा गुरव (यादव गट), प्रभाग क्रमांक १० मधून  ओंकार गावडे (यादव गट),  सुवर्णा कांबळे (यादव गट) विजयी झाले.

जयसिंगपूरमध्ये आमदार यड्रावकरांचे बंधू विजयी

जिल्ह्यातील मोठी नगरपालिका असलेल्या जयसिंगपूर नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत राजर्षी शाहू आघाडीच्या संजय पाटील यड्रावकर यांनी बाजी मारली आहे. शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे ते बंधू आहेत. यड्रावकरांच्या विरोधात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी शरद पवार गट विरोधात होते. नगरपालिकेत प्रभाग क्रमाकं १ मधून निरमल कोळी ,  तेजश्री राहुल पाटील, प्रभाग २ मधून रूपाली बंडगर, सचिन चौगुले,  प्रभाग क्र. 3 मधून  मीनल नांद्रेकर, सचिन निटवे, प्रभाग क्र ४ मधून शकुंतला मछले ,  लक्ष्मण गोसावी, प्रभाग क्र. मधून  सुमय्या कडबी, बजरंग खामकर,  प्रभाग क्र. ६ मधून  महेश कलकुटगी,  स्वाती मदनाईक, प्रभाग क्र. ७ मधून अनिता कोळेकर,  संतोष जाधव, प्रभाग क्र. ८ मधून उज्वला वागवेकर,  पराग पाटील, प्रभाग क्र. ९ मधून  अशोक मळगे,  असलम फरास,  प्रभाग क्र. १० राजू देशमुख, अनुराधा आडके, प्रभाग क्र. ११ मधून गीता भोसले,  रंगराव पवार,  प्रभाग क्र. १२ मधून अर्चना आडगाणे, संजीव कुमार पाटील,  प्रभाग क्र. १३ मधून लता गाडेकर,  पंकज गुरव  विजयी झाले.

गडहिंग्जलवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच झेंडा

गडहिंग्लज नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने नगराध्यक्षपदासह तब्बल १७ जागांवर दणदणीत विजय मिळविला. विरोधी महायुतीला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत मुश्रीफांविरोधात जनता दल, भाजप, जनसुराज्य, शिवसेना (शिंदे) या महायुतीचे आव्हान होते. राष्ट्रवादीचे महेश तुरबतमठ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. प्रभाग १ मधून  मीनाक्षी कुराडे (राष्ट्रवादी), संजय रोटे (जनता दल) विजयी झाले.  प्रभाग २ मधून संतोष चिकोडे (राष्ट्रवादी), अरुणा कोलते (राष्ट्रवादी),  प्रभाग ३ मधून  सुजाता मांगले (राष्ट्रवादी),  अमर मांगले (राष्ट्रवादी),  प्रभाग ४ मधील बीना कुराडे (जनसुराज्य),  रश्मिराज देसाई (राष्ट्रवादी),  प्रभाग ५ मधून  स्वाती कोरी (जनता दल),  नितीन देसाई (जनता दल),  प्रभाग ६ मधून बसवराज खणगावे (राष्ट्रवादी), अनिता खोत (भाजप), प्रभाग ७ मधून रुपाली परीट (राष्ट्रवादी), नरेंद्र भद्रापूर (राष्ट्रवादी), प्रभाग ८ मधून महेश सलवादे (राष्ट्रवादी), शबनम सय्यद (राष्ट्रवादी),  प्रभाग ९ रामगोंडा पाटील (राष्ट्रवादी), दर्शना कुंभार (राष्ट्रवादी), प्रभाग १०विठ्ठल भमानगोळ (राष्ट्रवादी),  आरती देवगोंडा (राष्ट्रवादी),  प्रभाग ११ उदय परीट (राष्ट्रवादी), स्वाती चौगुले (पुरस्कृत) विजयी झाल्या.

हुपरीत भाजप आरपीआयचे मंगलराव माळगे विजयी

हुपरी नगरपालिकेमध्ये भाजप युतीचे उमेदवार आरपीआयरचे मंगलराव माळगे विजयी झाले. हुपरीवर भाजपने सत्ता मिळवताना त्यांचे १८ उमेदवार विजयी झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन जागा जिंकून जिल्ह्यात आपले अस्तित्व दाखवले. हुपरीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला आपला प्रभाव दाखवता आला नाही.

पेठवडगावमध्ये विद्याताई पोळ दुसऱ्यांदा नगराध्यपदी निवडून आल्या

पेठ वडगावमध्ये विद्याताई पोळ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. विद्याताई पोळ दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. या ठिकाणी यादव आघाडीचे १५ उमेदवार विजयी झाले तर जनसुराज्य आघाडीला पाच जागांवर समाधान मानावे लागले. वडगाव नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यादव आघाडीच्या विद्यादेवी गुलाबराव पोळ यांना 2263 मतांनी निवडून आल्या आहेत. यादव गटाच्या १५ नगरसेवक तर विरोधी सालपे  गटाचे नगरसेवक पदाचे 5 उमेदवार निवडून आले आहेत. ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती.कुरुंदवाड नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शाहू आघाडीच्या मनिषा डांगे विजयी झाल्या.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर