मुंबई : प्रतिनिधी : सलग तीन वर्षे बंद असलेल्या आणि आर्थिक अडचणीतील राज्यातील सात साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) कर्ज देण्यास नकार दिला आहे. कारखाना वाचवण्यासाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार संग्राम थोपटेंना मोठा दणका बसला आहे. त्यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याला कर्ज नाकारले. राजगड कारखान्याने एनसीडीसीकडे कारखान्याचा विस्तार करण्यासाठी ४६७.८५ कोटी कर्जाचा प्रस्ताव दिला होता. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा कर्ज प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे. (The NCDC has denied loans to seven sugar factories)
राज्यातील १४ साखर कारखान्यांनी एनसीडीसीला कर्जाचे प्रस्ताव पाठवले होते. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील श्री भोगावती सहकारी साखर कारखाना, श्री दूधगंगा, वेदगंगा सहकारी साखर कारखाना, तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, सांगली जिल्ह्यातील क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखाना, अहिल्यानगरातील मुळा सहकारी साखर कारखाना, सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, बीड जिल्ह्यातील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याला कर्ज मंजूर झालेले नाही. (The NCDC has denied loans to seven sugar factories)
कारखान्याचे भाग भांडवल कमी असणे, आर्थिक अनियमितता, सतत तीन वर्षे आर्थिक तोटा यामुळे जालन्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखाना, धाराशिव जिल्ह्यातील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना, पुण्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना, सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, अहिल्यानगरातील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना, पुणे जिल्ह्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, राजगड सहकारी साखर कारखान्याचे कर्ज प्रस्ताव नाकारले आहेत. (The NCDC has denied loans to seven sugar factories)