मुंबई पोलिसांच्या विरोधामुळे काला घोडा फेस्टिव्हलमधील प्रा. तेलतुंबडेचे चर्चासत्र रद्द!

The discussion session with Teltumbde has been cancelled

जमीर काझी :  मुंबई : देशभरात प्रसिद्ध असलेल्या दक्षिण मुंबईतील ‘काला घोडा आर्ट फेस्टिव्हल’यंदा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. या ठिकाणी होणाऱ्या ‘इन्कार्सरेटेड : टेल्स फ्रॉम बिहाइंड बार्स’ या विषयावर डाव्या चळवळीतील जेष्ठ विचारवंत प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या प्रमुख उपस्थितील चर्चासत्राला मुंबई पोलिसांनी विरोध केला आहे. त्यांच्यामुळे समाजात तणाव उदभविण्याची शक्यता वर्तवून त्याला आक्षेपाची  नोटीस दिल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.  (The discussion session with Teltumbde has been cancelled)

प्रा.आनंद तेलतुंबडे यांच्यावर एनआयएने  कथित शहरी नक्षलवाद प्रकरणी ‘युएपीए’च्या कलमांखाली अटक करून सहा वर्षे कारागृहात ठेवले होते. सध्या ते जामिनावर बाहेर आहे.  महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या प्रायोजकत्वाखाली होणाऱ्या काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलमध्ये ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्यासाठी सरकार प्रायोजित तुरुंगवास’ या विषयावर व्याख्यान आयोजित होणे योग्य आहे का?, असा सवाल सोशल मीडियावरून काही उजव्या विचारसरणीचे समर्थकांनी उपस्थित केला होता. त्यावरून  सांस्कृतिक महोत्सवात अशा स्वरूपाच्या गंभीर प्रकरणांशी संबंधित व्यक्तिचा समावेशामुळे सरकारविरोधात तरुणांची मानसिकता बदलेल. त्यांच्या मनात विद्रोही विचार निर्माण होतील. समाजात असंतोष पसरेल,त्यामुळे हे चर्चासत्र ठेवणे योग्य नाही, अशी अशी सूचना पोलिसांनी नोटिशीद्वारे संयोजकांना पाठवली आहे.  त्यामुळे तो रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. 

काला घोडा महोत्सव गेली २५ वर्षेपासून  करण्यात येते.  आठवडाभर चालणाऱ्या कला महोत्सवात हजारो लोक हजेरी लावतात. त्यामध्ये प्रामुख्याने तरुणांची संख्या अधिक असते. (The discussion session with Teltumbde has been cancelled)

कायद्याचे राज्य नाही:  प्रा. आनंद  तेलतुंबडे

गेल्यावर्षी प्रकाशित झालेल्या ‘दि सेल अ‍ॅण्ड दि सोल : ए प्रिजन मेमॉयर’ या पुस्तकातून  भारतातील कारागृह व्यवस्थेतील क्रूर वास्तव आणि  कैद्यांच्या दुर्दशेचा पर्दाफाश केला आहे. त्यावर अनेक चर्चासत्रे झाली असून पुस्तकावर कुठलीही बंदी नाही. तरीही कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडण्याचा अर्थ याठिकाणी कायद्याचे राज्य नाही.  आयोजकांनी चर्चासत्रासाठी आग्रही राहण्याची आवश्यकता होती. (The discussion session with Teltumbde has been cancelled)

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार