निवडणूक पैशांच्या जोरावर, ईडीची भिती दाखवून लढू नये: सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका

Supriya Sule criticizes horse-trading in the election

मुंबई : प्रतिनिधी : ‘महाविकास आघाडी नाही तर माघार पार्टी असे म्हणावे लागेल’ या भाजपच्या टीकेचा सुप्रिया सुळेंनी चांगलाच समाचार घेतला. कोणतीही निवडणूक पैशांच्या जीवावर लढू नये, आयकर विभाग, सीबीआय आणि ईडीची भिती दाखवू नये अशी टीका करत भाजपने मला तोंड उघडायला लावू नये असा इशाराही सुळे यांनी दिला. (Supriya Sule criticizes horse-trading in the election)

सुप्रिया सुळे म्हणाल्या. मी सुसंस्कृत असल्याने भाजपने मला तोंड उघडायला लावू नये. विधानसभा आणि लोकसभेत आम्ही भाजपच्या विरोधात ताकदीने लढू. या निवडणुकीत घोडेबाजार कसा झाला हे सर्वांना माहित आहे. कोणतीही निवडणूक पैशांच्या जीवावर लढू नये. आयकर विभाग, सीबीआय, ईडीचीही भिती दाखवू नये. हा देश लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे असेही त्या म्हणाल्या. (Supriya Sule criticizes horse-trading in the election)

लोकसभेत बिल मांडणार…. पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीतील काँग्रेस आणि शिवसेनेने केलेल्या टीकेवर त्या म्हणाल्या, पुण्यातील माघारीचा निर्णय काँग्रेस आणि शिवसेना ठाकरेंच्या नेत्यांशी चर्चा करुन घेण्यात आला आहे. कारण या निवडणुकीत घोडेबाजाराची मोठी चर्चा होती. महाविकास आघाडीच्या आठ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यासाठी मी स्वत: बिल आणत आहे. सगळ्या निवडणुकीत घोडेबाजाराचा आरोप होतो. हा बंद झाला पाहिजे. हात वर करुन सरपंच ते लोकसभा निवडणूक पारदर्शकपणे झाली पाहिजे. हे बिल मी स्वत: मांडत आहे. भविष्यात बदल दिसेल असा विश्वासही सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला. (Supriya Sule criticizes horse-trading in the election)

Related posts

पहिल्या यादीत फक्त ५५३ शेतकऱ्यांना कर्जमाफी

१० वर्षात १५२ पेपर फुटले, साडेसात कोटी विद्यार्थी भरडले : राहूल गांधी

रास्त मुद्दे, तरी अवसानघातकी `पवार` वेळ