Sule slams Maha Govt: आम्ही काय खायचं हे तुम्ही ठरवणार का?: सुळेंचा सवाल

Sule slams Maha Govt

मुंबई : स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदी करण्याचा निर्णय राज्यातील काही महापालिकांनी घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तसे आवाहन केले आहे. या निर्णयाविरोधात टीकेची राळ उडाली आहे. आम्ही काय खायचे हे तुम्ही ठरवणार का? असा सवाल आता व्यक्त होत आहे. (Sule slams Maha Govt)

या निर्णयाविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी संबंधितांवर जोरदार टीका केली आहे.

आम्ही काय खायचं हे आता सरकार ठरवणार आहे का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. (Sule slams Maha Govt)

संजय राऊत यांनी या सरकारच्या निर्णयावर घणाघाती प्रहार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हा निर्णय देत असतानाच महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचा त्या संदर्भातील निर्णय असल्याचे सांगत आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. मात्र, संजय राऊत यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार प्रहार केला. (Sule slams Maha Govt)

संजय राऊत म्हणाले की शरद पवार मुख्यमंत्री राहून किती काळ लोटला? तुमच्याकडे अशा प्रकारे कोणी मागणी केली होती का? फडणवीसांना या संदर्भात काही माहिती आहे का? अशी विचारणा राऊत यांनी केली.
ते म्हणाले की केव्हाचे आदेश बाहेर काढले जात आहेत. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते मग तत्पूर्वी शरद पवार मुख्यमंत्री होते. मात्र, शरद पवार अशा पद्धतीने बंदी करत असतील तर ते आश्चर्य असल्याचे ते म्हणाले. अशी थोतांड करू नका, असं संजय राऊत यांनी सुनावलं. ते पुढे म्हणाले की 15 ऑगस्ट हा धार्मिक सण नसून तो विजयोत्सव आहे. मात्र भाजपकडून प्रत्येक सणाला धार्मिक सण म्हणून पाहिले जात असल्याचे ते म्हणाले. तुम्हाला हवं तर पुरणपोळ्यांच्या पार्ट्या द्या, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार