कोल्हापूर : प्रतिनिधी : कॅरम स्पर्धेत साताराचा सुधीर महापुरे विजेता ठरला. कोल्हापूरच्या सम्राट लकडेचा अत्यंत चुरशीच्या सामन्यात १३/१०, १७/१५, २५/६ अशा फरकाने त्याने सामना जिंकला. तो कै. अरविंद जोशी स्मृती चषकाचा मानकरी ठरला. सुधीरला रूपये दहा हजार आणि चषक प्रदान करण्यात आला. सम्राट लकडे उपविजेता ठरला. त्याला रोख रुपये सात हजार आणि चषक देण्यात आला. (Sudhir Mahapure win)
महाराष्ट्र कॅरम आणि कोल्हापूर जिल्हा कॅरम असोसिएशनचे सहकार्याने प्रकाश क्लब कॅरम वतीने स्पर्धा झाल्या. यात सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
तृतीय क्रमांक मानकरी कराडचा जल्लाल मुल्ला ठरला. त्याला चार हजार रुपये व चषक, चतुर्थ क्रमांक मिरजेचा आसिफ सिपाई रूपये तीन हजार व चषक देण्यात आला. पाच ते आठ क्रमांकाच्या रोहित चौगुले, शुभम पाटील, अख्तर शेख, गौरव हुदले या विजेत्यांना प्रत्येकी एक हजार व चषक देऊन गौरविण्यात आले.(Sudhir Mahapure win)
अंतिम स्पर्धेचा नाणेफेक नितीन सोनटक्के यांच्या हस्ते व कोल्हापूर जिल्हा कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष राजू मेवेकरी, विजय जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आली. उपांत्य फेरीचे नाणेफेक अॅड तन्मय, राजू मेवेकरी यांच्या हस्ते करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते सतीश सोनटक्के, श्नी शिवछत्रपती पुरस्कार विजेते, क्रीडामहर्षी विजय जाधव, नामदेव टमके, सुर्यकांत पाटील यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सूर्यकांत पाटील, गौरव हुदले यांनी पंच म्हणून काम केले. बोर्ड रेफरी म्हणून राजू वडर, ओमकार वडर, संतोष देशपांडे, मंजूर शेख, अस्लम शेख शिवशंकर भस्मे यांनी केले. (Sudhir Mahapure win)
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रकाश क्लबचे नितीन सोनटक्के, अख्तर शेख, सम्राट लकडे, इक्बाल बागवान, गौरव हुदले, सूर्यकांत पाटील यांचे सहकार्य मिळाले. स्पर्धेसाठी राम आहुजा, सतीश सोनटक्के, गणेश मोबाईल, शोभा कामत संतोष कणसे, प्रमोद जोगळेकर यांनी बक्षीसे दिली. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार यांनी उत्कृष्ट कॅरम बोर्ड देऊन मोलाची मदत केली.
हेही वाचा :
मुंबई, बारामती, कोकणाला पावसाने झोडपले
चेन्नई सुपर किंग्जचा गुजरात टायटन्सला दणका