Subhash Jadhav Passes Away: माकपचे नेते सुभाष जाधव यांचे निधन

(Subhash Jadhav Passes Away)

कोल्हापूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रा. डॉ. सुभाष आत्माराम जाधव यांचे निधन झाले. रविवारी (२८ सप्टेंबर) सकाळी सहाच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. निधनसमयी त्यांचे वय ६५ वर्षे होते. (Subhash Jadhav Passes Away)

कोणतेही धार्मिक विधी न करता पंचगंगा स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव शांतिनिकेतन हायस्कूलजवळील त्यांच्या निवासस्थानापासून शववाहिकेतून पंचगंगा घाटावर नेण्यात आले. (Subhash Jadhav Passes Away)

प्रा. जाधव माकपचे राज्य समिती सदस्य आणि कोल्हापूर जिल्हा समितीचे सचिव म्हणून कार्यरत होते.

प्रा. जाधव कष्टकरी, श्रमिक, धरण आणि प्रकल्पग्रस्तांच्या चळवळीत सक्रीय होते. दोन दिवसापूर्वी चंदगडमधील साखर कारखाना कामगारांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनाच्या निमित्ताने ते सक्रीय होते. सीआयटीयू या कामगार संघटना महासंघाचे महाराष्ट्र सचिव, महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार युनियनचे सचिव, चंदगड तालुका साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनचे जिल्हा कमिटी सदस्य अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे चळवळीची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Related posts

अल्पसंख्याक मुलींच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीला गती द्या : सुनेत्रा  पवार 

मराठी सक्तीचीच या मुख्यमंत्र्यांच्या  घोषणेचे ‘म्यांव’ का झाले?;  संजय राऊतचा हल्लाबोल 

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ‘व्हीएसआर’ला १४५ कोटींचे वाटप