Start of Diwalis : प्रकाशोत्सवास प्रारंभ

Start of Diwalis

कोल्हापूर : प्रतिनिधी : वादळ, भूसख्खलन, अतिवृष्टी अशी नैसर्गिक संकटे तर दुसरीकडे जागतिक व्यापार युद्धाचे पडसाद, सीमेवर दहशतवाद अशा संकटांच्या मालिकांना विसरुन भारतीयांनी ‘‘ज्योत से ज्योत जलाते रहो” या भावनेने उत्साहात दीपावलीचे स्वागत केले. घरोघरी, खेड्या पाड्यात, वाड्या वस्त्या, व्यापारी संकुल, कार्पोरेट ऑफिसमध्ये दिवे, पणत्या, आकाश कंदील लावून दीपावलीचा आनंद लुटण्यास सुरुवात केली. पुढील तीन दिवसात लक्ष्मीपूजन, दीपावली पाडवा आणि भाऊबीज हे सण असून एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी कुटुंब आणि मित्र मंडळी एकत्र आली आहेत. (Start of Diwalis)

देशभर अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाल्याने अनेकांनी साधेपणाने दीपावली साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात मराठवाड्यात अतोनात नुकसान झाल्यान बहुतांशी राजकीय नेते आणि पक्षांनी दीपावली साधी पणाने साजरी करत आहेत. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात शरयू नदीवर लाखो दिवे प्रवज्वलीत करुन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा जल्लोष सुरू आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणूकीचा माहोल सुरू असल्याने राजकीय वातावरण तापूनही दिवाळी साजरी केली जात आहे.

जीएसटीचे दर कमी झाल्याने ग्राहकांकडून खरेदीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे जोरदार बुकींग झाले आहे. दीपावली पाडव्याच्या शुभमुहुर्तावर बंपर खरेदी होणार आहे. तर दुसरीकडे तयार कपड्यांच्या बाजारापेठेत मोठी उलाढाल झाली आहे. सोन्याचे दर स्वव्वा लाखाच्या आसपास गेले असतानाही सणाचे पारंपरिकता जपताना गुंजभर सोने खरेदीसाठी शोरुममध्ये रांगा लागल्या आहेत. जीएसटी कमी झाला असतानाही अनेकांनी दर वाढवून ग्राहकांचा खिसा मोकळा केला आहे. (Start of Diwalis)

आज सोमवारी नरकचतुर्दशीला अंभ्यगस्नानाने दीपावलीची पहाट उगवली. देभभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. कोल्हापूरात करवीनिवासिनी अंबाबाई, शिर्डीला साईबाबांचे, तुळजापूरला तुळजाभवानीचे तर देशातील अयोध्या, मथुरा, वृदांवन या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होता. गोडधोड फराळ, मिठाईची देवाणघेवाण घेत दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. फटाक्यांची दणक्यात आतषबाजी झाली.

मंगळवारी होणाऱ्या लक्ष्मीपुजनासाठी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली आहे. दीपावली पाडव्या दिवशी साडेतीन मुहुर्तापैकी एक असल्याने बाजारपेठ सज्ज झाल्या आहेत. यंदा ग्राहकांकडून बंपर खरेदी होण्यासाठी शक्यता असल्याने मोठी उलाढाल होणार आहे.  (Start of Diwalis)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर