लखनौ : समाजवादी पक्षाने (सपा) सोमवारी (२३ जून) त्यांच्या तीन आमदारांची हकालपट्टी केली. पक्षविरोधी कारवाया, पक्षाच्या मूलभूत मूल्यांशी प्रतारणा आणि जातीय, फुटीर आणि नकारात्मक विचारसरणीचे समर्थन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचे पक्षाने म्हटले आहे. (SP expels three MLAs)
गोसाईगंजचे आमदार अभय सिंह, राकेश प्रताप सिंह (गौरीगंज) आणि मनोज कुमार पांडे (उनचाहार) अशी या आमदारांची नावे आहेत. या तिघांवर सार्वजनिक हिताच्या विरोधात काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
समाजवादी पक्षाच्या समावेशक आणि प्रगतीशील तत्त्वांच्या विरोधात जाणाऱ्या जातीय, फुटीर आणि नकारात्मक विचारसरणीचे समर्थन केल्याबद्दल या तिघांवर कारवाई करण्यात आल्याचे पक्षाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. (SP expels three MLAs)
पक्षाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कारवाई केलेल्या तिन्ही आमदारांनी महिलाविरोधी आणि शेतकरीविरोधात भूमिका घेतली. युवक, व्यापारी, मागासवर्गीय, दलित आणि उपेक्षितांच्या हक्कांविरोधात काम करत असलेल्या राजकीय घटकांना आणि विचारांना सक्रियपणे पाठिंबा आणि मदत केल्याचाही आरोप केला आहे. (SP expels three MLAs) समाजवादी पक्षाच्या निवेदनात असेही म्हटले आहे की, या तिन्ही नेत्यांना पूर्वी आपल्या वर्तनात सुधारणेसाठी ‘ग्रेस पीरियड’ देण्यात आला होता, परंतु ती वेळ आता निघून गेली आहे. सार्वजनिक कल्याण किंवा त्यांच्या मुख्य वैचारिक चौकटीविरुद्ध काम करणाऱ्या व्यक्तींना पक्षात जागा नाही, असेही म्हटले आहे.
हेही वाचा :
गुजरात पोटनिवडणूक; विसावदरमध्ये ‘आप’चा विजय