Somnath Suryvanshi: सोमनाथ सूर्यवंशींचा कोठडीत मृत्यू; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Somnath Suryvanshi

छत्रपती संभाजीनगर : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईंच्यावतीने कोर्टात बाजू मांडली होती. (Somnath Suryvanshi)

यावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने शुक्रवारी (४ जुलै) संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस कोठडीत झालेल्या अमानुष मारहाणीतच झाल्याचे पुराव्यातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे खंडपीठाने संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. (Somnath Suryvanshi)

फडणवीस सभागृहात खोटे बोलले : काँग्रेस

दरम्यान, या प्रकरणात काँग्रेसने ट्विट करत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा अपघात नाही, हा दलित युवकाचा पोलिसांनी केलेला खून आहे. संविधानासाठी लढणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशींना पोलिसांनी अटक केली. जात द्वेषातून आणि संविधान द्वेषातून तुरुंगात असलेल्या सोमनाथ यांना प्रचंड मारहाण झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. (Somnath Suryvanshi)

पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यावेळी गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी “मारहाण झालीच नाही” अशी विधानसभेत चक्क खोटी माहिती दिली.

व्हिडिओ फुटेज, मेडिकल रिपोर्ट आणि मोठी भाषणे करून जनतेला फडणवीसांनी फसवले.

चौकशीअंती आता कोर्टाने पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.

जर पोलिसांवर गुन्हा दाखल करायचे आदेश कोर्ट देत असेल तर गृहमंत्री सभागृहात खोटे का बोलले ???

“तो आजारी होता” अशी धादांत खोटी कारणे फडणवीसांनी का दिली ?

जातीय द्वेष, संविधान द्वेष की मनुवादी विचारसरणी?, असे सवालही केले आहेत.

लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी भेट दिली तेव्हा त्यांनी सर्वप्रथम “हा खून आहे” असे उद्गार काढले होते, तेव्हा भाजप सरकारने त्यावरही राजकारण केलं.

आज कोर्टाने तोच निर्णय दिला.

आता हा लढा केवळ सोमनाथच्या कुटुंबाचा नाही.

 हा लढा आहे मनुवादी विचारसरणी विरुद्ध संविधानाच्या संरक्षणाचा, असेही काँग्रेसने म्हटले आहे.

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या