SIT in Mahadev Munde Murder : महादेव मुंडे हत्येचा तपास एसआयटीकडे : मुख्यमंत्र्यांची घोषणा

SIT in Mahadev Munde Murder

मुंबई : परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक (एसआयटी) करेल, अशी घोषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (३१ जुलै) केली. (SIT in Mahadev Munde Murder)

या पथकाला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात येईल. या प्रकरणात कुणीही असो, त्याला सोडणार नाही, असा स्पष्ट शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. महादेव मुंडे हत्याप्रकरणी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी आणि कुटुंबाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या हत्येत सहभागी असणाऱ्यांना अटक करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

ज्ञानेश्वरी मुडेंनी केलेल्या मागणीनुसार पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या २१ महिन्यांपासून महादेव मुंडे प्रकरणातील आरोपी खुलेआम फिरत आहेत. त्यांना अटक करण्याची जबाबदारी आता एसआयटीवर असेल. (SIT in Mahadev Munde Murder

परळीत दोन वर्षांपूर्वी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी वाल्मिक कराड आणि त्याचा मुलगा सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच कराड टोळी आणखी काही लोक यामध्ये असल्याचा आरोप केला जात आहे.

मुख्यमंत्री भावूक

ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीची माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘‘गेल्या २१ महिन्यांचा वृत्तांत मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला. हे ऐकून मुख्यमंत्री भावुक झाले. या प्रकरणात जे दोषी असतील त्याला सोडणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला.’’

आ. रोहीत पवार यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

दरम्यान, महादेव मुंडे हत्या प्रकरणात आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करून त्यामध्ये पीएसआय संतोष साबळे यांना सहभागी करण्याची मुंडे कुटुंबाची मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे आमदार रोहीत पवार यांनी आभार मानले आहेत. आता एसआयटीच्या माध्यमातून कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय आणि राजकीय दबावाशिवाय निश्चित कालावधीत तपास पूर्ण होईल, हा विश्वास आहे, असे त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. (SIT in Mahadev Munde Murder

मुख्यमंत्र्यांनी मुंडे कुटुंबाची भेट घेण्यास उशीरच केला. मुख्यंत्र्यांनी उशीर केला नसता तर कदाचित ज्ञानेश्वरी मुंडेंना पोलीस कार्यालयासमोर विष प्राशन करण्याची वेळ आली नसती, २१ महिन्यात हे प्रकरण थोडे तरी पुढे सरकले असते. आता उशिरा का होईना शेवटी मुंडे कुटुंबाची भेट घेऊन त्यांची भूमिका समजून घेतली, हे महत्वाचे आहे.

आता आरोपींना पकडणे ही प्राथमिक पायरी पुर्ण केल्यानंतर सरकारने राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या वकिलांमार्फत हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून मुंडे कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी, अशी विनंतीही आ. पवार यांनी केली आहे.

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या