संतोष देशमुख हत्या तपासासाठी एसआयटी

मुंबई : सद्या राज्यात चर्चेचा विषय बनलेल्या बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी अखेर विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले. गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांची टीम बनवण्यात आली आहे. देशमुख यांचे अपहरण आणि हत्येच्या घटनेचा तपास या पथकाकडून करण्यात येईल. (Santosh Deshmukh)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात तशी घोषणा केली होती. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने त्याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.

राज्यभर गाजत असलेल्या देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे असून हत्येच्या २२ दिवसानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड मंगळवारी सीआयडीसमोर शरण आला. मात्र त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल असून त्याला पंधरा दिवसांची सीआयडी कोठडी मिळाली. अद्याप देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कराडला आरोपी बनवण्यात आलेले नाही.  त्याचे राजकीय गॉडफादर आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांची दीर्घकाळ भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कराडने व्हिडिओ जारी करीत सीआयडीसमोर शरणागती पत्करली होती. (Santosh Deshmukh)

या योगायोगाबद्दल विरोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांतून शंका उपस्थित होत आहेत. हत्येचा तपास जलदगतीने व्हावा, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी मस्साजोग येथे बुधवारी जलसमाधी आंदोलन करण्यात आले. त्यामुळे  या घटनेतील अन्य फरारी आरोपींना तातडीने पकडण्यासाठी सीआयडीने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. आता राज्य शासनाकडून देशमुख हत्येप्रकरणी डीआयजी बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन केली आहे. उपअधीक्षक अनिल गुजर, एपीआय, विजयसिंग जोनवाल, पीएसआय महेश विघ्ने, आनंद  शिंदे,एएसआय तुळशीराम जगताप, मनोज वाघ, चंद्रकांत काळकुटे, बाळासाहेब  अहंकारे, संतोष  गित्ते यांचा या पथकात समावेश आहे.

खुनाच्या गुन्ह्यात कधी घेणार?

या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मकक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. त्याला देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्याची कलमे कधी लावणार आणि सर्व आरोपींवर मोक्का कधी लावणार?, असा सवाल देशमुख यांचे कुटुंबीय, विरोधी पक्ष आणि तेथील ग्रामस्थांतून विचारण्यात येत आहे. (Santosh Deshmukh)

हेही वाचा :

Related posts

Karun Nair : करुण नायरचा विश्वविक्रम

woman jumps:आणि तिने रिक्षातून उडी मारली

human barbie: तारुण्य टिकवण्यासाठी तिने मुलाचे…