Shot dead and sucide : पत्नी, मुलाची हत्या करुन सीईओची आत्महत्या

Shot dead and sucide

नवी दिल्ली : भारतातील एका उद्योजकाने पत्नी आणि मुलांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. अमेरिकतील वॉशिंग्टनमधील न्यू कॅसल येथील त्यांच्या घरी ही घटना घडली. या दांपत्याचा दुसरा मुलगा घरी नसल्याने वाचला आहे. (Shot dead and sucide)

म्हैसूर येथील उद्योजक हर्षवर्धन किक्केरी (४५) यांनी २४ एप्रिल रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टनजवळील न्यूकॅसल येथील त्यांच्या घरी पत्नी श्वेता (४१) आणि त्यांच्या १४ वर्षांच्या मुलाची गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यांचा धाकटा मुलगा घरी नसल्याने वाचला आहे.

द सिएटल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार किंग काउंटीमधील एका टाउन हाऊसमध्ये तीन मृतदेह आढळले. घटनास्थळी पोलिसांना खिडकीवर रक्त, रस्त्यावर गोळी आणि तीन मृतदेह दिसून आले अशी माहिती  किंग काउंटी शेरीफचे प्रवक्ते ब्रँडिन हल यांनी दिली. म्हैसूरमधील एका कुटुंबातील मित्राने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ही घटना कळताच उद्योजक हर्षवर्धन यांची ची आई,गिरीजा म्हैसूरमधून अमेरिकेला रवाना झाली आहे. त्याचा मोठा भाऊ, चेतन, जो स्वतःही अमेरिकेत होता, तो अलिकडेच कायमचा म्हैसूरला परतला. हर्षवर्धनचे वडील किक्केरी नारायण हे एक प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ आणि पुरोगामी कार्यकर्ते होते. (Shot dead and sucide)

मांड्या जिल्ह्यातील केआर पेट तालुक्यातील किक्केरी येथील रहिवासी असलेले हर्षवर्धन यांनी म्हैसूर येथे स्थित होलोवर्ल्ड ही रोबोटिक कंपनी स्थापन केली. कोविड साथीच्या आजारामुळे कंपनी बंद पडल्यानंतर, हे जोडपे अमेरिकेत परतले. कुटुंबातील मित्राच्या मते, हर्षवर्धन २०२२ पासून म्हैसूरला भेट दिलेले नाही. द सिएटल टाईम्सच्या वृत्तानुसार, वैद्यकीय परीक्षकांच्या कार्यालयाने श्वेता आणि मुलाच्या मृत्यूला खून म्हणून घोषित केले, तर हर्षवर्धनचा मृत्यू आत्महत्या म्हणून वर्गीकृत करण्यात आला. (Shot dead and sucide)

हेही वाचा :

हॉटेलला लागलेल्या आगीत १४ ठार

हॉटेलला लागलेल्या आगीत १४ ठार

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी