Shaha slams oppositions: घुसखोर ही विरोधकांची मतपेढी : अमित शहांची टीका

Amit shah

सीतामढी (बिहार) : घुसखोर ही विरोधकांची मतपेढी आहे. मतांसाठी ते घुसखोरांना संरक्षण देत आहेत, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांवर केली. (Shaha slams oppositions)

 बिहारच्या विशेष सखोल सुधारणा (एसआयआर) मोहिमेला राहुल गांधी आणि विरोधकांनी विरोध केला आहे. यावरून शहा यांनी गांधी यांच्यासह विरोधकांना शुक्रवारी (८ ऑगस्ट) लक्ष्य केले.

२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नवीन कनेक्टिव्हिटी प्रकल्पांची घोषणा करताना सीतामढी येथील जानकी माता मंदिराच्या ८८३ कोटी रुपयांच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन केले. (Shaha slams oppositions)

गृहमंत्री अमित शहा राहुल गांधींवर टीका करताना म्हणाले की, गांधी संविधानाची प्रत घेऊन फिरतात. त्यांनी ती उघडून वाचावी. घुसखोर त्यांची मतपेढी आहे. त्यामुळे सर्व विरोधक बिहारमधील विशेष सखोल सुधारणा (एसआयआर) ला विरोध करत असल्याचा आरोपही शहा यांनी केला.

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी घुसखोरांची नावे मतदार यादीतून काढली गेली पाहिजेत की नाही, असा सवाल करून शहा यांनी बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर राजद नेते तेजस्वी यादव यांना फटकारले. ते म्हणाले, “मी तेजस्वी यादव यांना विचारू इच्छितो की, त्यांचे वडील आणि आई बराच काळ सत्तेत होते. गुंडगिरी, टोळ्या चालवणे, अपहरण करणे, खंडणी मागणे याशिवाय तुम्ही मिथिलांचलच्या विकासासाठी काय केले आहे?”

बिहारमध्ये एनडीएला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला. (Shaha slams oppositions)
शहा यांनी सीतामढीतील पुनौरा धाम येथील जानकी माता मंदिराच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर