SC on firecrackers: फटाक्यांवर देशभर बंदी हवी : सर्वोच्च न्यायालय

SC on firecrackers

नवी दिल्ली : केवळ दिल्ली-एनसीआरमधील रहिवाशांसाठीच नव्हे; प्रदूषणमुक्त हवेचा अधिकार लक्षात घेऊन संपूर्ण भारतात फटाक्यांवर बंदी घालण्याची गरज आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने तोंडी नोंदवले. (SC on firecrackers)

मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने शुक्रवारी (१२ सप्टेंबर) एनसीआरमध्ये फटाके आणि पेंढा जाळण्यासारख्या विविध स्रोतांपासून होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबतच्या प्रकरणाची सुनावणी केली. एम.सी. मेहता यांनी ही याचिका दाखल केली आहे.

यापूर्वी, न्यायमूर्ती अभय एस. ओका आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांना पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ च्या कलम ५ अंतर्गत राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्याचे निर्देश दिले होते.(SC on firecrackers)

आज, सुनावणीदरम्यान, खंडपीठाला माहिती देण्यात आली की, न्यायालयाच्या मागील आदेशांनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. अमिकस क्युरी, वरिष्ठ वकील के. परमेश्वर म्हणाले की ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीसाठी बंदी योग्य ठरली असती. फटाक्यांची निर्मिती, व्यापार आणि विक्रीवर पूर्ण बंदी घातल्यास अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल, असे ते म्हणाले.(SC on firecrackers)

यावर सरन्यायाधीशांनी तोंडी निरीक्षण नोंदवताना, प्रदूषणमुक्त हवेचा अधिकार फक्त दिल्ली-एनसीआरमध्ये राहणाऱ्यांनाच आहे असे गृहीत धरणे चुकीचे ठरेल. ‘‘जर एनसीआरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रदूषणमुक्त हवेचा अधिकार आहे, तर देशाच्या इतर भागातील नागरिकांना का नाही? … कारण ही राजधानी आहे किंवा सर्वोच्च न्यायालय येथे आहे म्हणून… आपल्याकडे प्रदूषणमुक्त हवा असली पाहिजे परंतु देशातील इतर नागरिकांना तो अधिकार नाही?,’’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार