Satej Agricultural Exhibition : सतेज कृषी प्रदर्शनाचे आयोजन

Satej Agricultural Exhibition

कोल्हापूर : प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने “सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन २०२५”  चे  ५ ते ८ डिसेंबर २०२५  या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Satej Agricultural Exhibition)

येथील तपोवन मैदान येथे हे प्रदर्शन चार दिवस भरविण्यात आले असून या प्रदर्शनात देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. याच बरोबर पशुपक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन,तांदूळ महोत्सव, विविध कंपन्यांची उत्पादने व शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान,नवीन अद्ययावत मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. (Satej Agricultural Exhibition)

प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता  होणार आहे. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर माजी आमदार ऋतुराज पाटील यांची उपस्थिती असणार आहे.

कृषी प्रदर्शनात २०० कंपन्यांचा सहभाग

        प्रदर्शनाचे सातवे वर्ष असून या प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, २०० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, १५० पेक्षा अधिक पशु-पक्षांचा सहभाग, शेती विषयक तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र, विविध शेती अवजारे, बी-बीयाणे खते आदींची माहिती, फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन) विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बचत गटांचे मोफत स्टॉल,लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश आहे. गोकुळ, महालक्ष्मी शेती विकास केंद्र शाहूपुरी, संजय घोडावत ग्रुप, चितळे डेअरी, यांचे प्रायोजकत्व प्रदर्शनाला लाभले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग,आत्मा,पशुसंवर्धन विभाग,जिल्हा परिषद,पणन विभाग, कृषी विज्ञान केंद्र, यांचे सहकार्य लाभले आहे. यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी-बियाणे, किटकनाशके, रासायनिक खते कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, धीरज पाटील, स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्निल सावंत हे कार्यरत आहेत. (Satej Agricultural Exhibition)

तांदुळ महोत्सवाचे आयोजन

प्रदर्शनामध्ये पीक स्पर्धा, पुष्प स्पर्धा, जनावरे स्पर्धा,खाद्य महोत्सवाचे आयोजित करण्यात आले आहेत. मागील दोन ते तीन वर्षात झालेल्या तांदळाची उचांकी विक्री पाहून याहीवर्षी तांदूळ महोत्सव देखील भरविण्यात आला आहे.  तसेच प्रदर्शनात पाचट व्यवस्थापन ए आय तंत्रज्ञानचा वापर करून स्मार्ट शेती उपयोग, ड्रोनद्वारे फवारणी सेंसरचा वापर कृत्रिम रेतन ए.आय किटचा वापर याबाबत प्रदर्शनात मार्गदर्शन होणार आहे.

यावेळी संयोजक विनोद पाटील,सुनील काटकर,धीरज पाटील, जयवंत जगताप सर कृषी विज्ञान केंद्र तळसंदे,जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगिरे,डॉ.सुनील कराड विभागीय संशोधन संचालक,नामदेवराव परीट, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, उपसंचालक कृषी  विभाग, डॉ.प्रमोद बाबर  पशु विभाग जिल्हा परिषद,नगरसेवक दुर्वासबापू कदम, कोल्हापूर,गोकुळचे हणमंत पाटील, डॉ.साळुंखे,युवराज पाटील तालुका कृषी अधिकारी, डी डी पाटील, महादेव नरके डी. वाय. पी.,स्काय स्टार इव्हेंट चे स्वप्नील सावंत उपस्थित होते. (Satej Agricultural Exhibition)

Related posts

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

हळद उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबवा; हळदीची गुणवत्ता तपासा

पहिल्या यादीत फक्त ५५३ शेतकऱ्यांना कर्जमाफी