Sapkal’s scathing criticism on CM: मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची दलाली बंद करावी : सपकाळ

Sapkal's scathing criticism on CM

मुंबई : विशेष प्रतिनिधी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीबद्दल पुरावे दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गृह विभागही आहे. त्यांच्या पोलिसांनी राजुरा विधानसभेतील मतचोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तरीही फडणवीस निवडणूक आयोगाची दलाली करत आहेत, त्यांनी ही दलाली बंद करावी, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी (१९ सप्टेंबर) केली. (Sapkal’s scathing criticism on CM)

दादर येथील काँग्रेस भवनात ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाकडून होत असलेली मतचोरी पुराव्यानिशी चव्हाट्यावर आणलेली आहे. त्याबाबत आयोगाला एकही खुलासा करणे शक्य नाही. त्यामुळे भाजपाच्या बुडाला आग लागली आहे. आयोग काही बोलत नाही. मात्र भाजपाचे नेते त्यासाठी का पुढे येतात?, हे स्पष्ट झाले पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मताची चोरी करून सत्ता मिळवलेली आहे. त्यामुळे ते खरे चोर आहेत.’’ (Sapkal’s scathing criticism on CM)

त्यांनी निवडणूक आयोगाची दलाली बंद करून आपल्याकडे असलेल्या गृह खात्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानावर बोलताना ते म्हणाले की, पूर्वी सुसंस्कृत, सभ्य, विचारवंत व कवी सत्ताधाऱ्यांसोबत असायचे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही नालायक आणि विकृत लोक पदरी ठेवले आहेत. जयंत पाटील यांच्याबद्दल केलेले विधान हे बेलगामपणाचा कळस असून फडणवीस हे लाचार आहेत. (Sapkal’s scathing criticism on CM)

आरएसएसला संविधान भेट देणार

महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी, दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत आहे. नियतीचा हा एक संकेत आहे. १०० वर्ष पूर्ण करणाऱ्या रा. स्व संघाने आता तरी नथुराम व विखारी विचार सोडून समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे संविधान व गांधी विचार स्विकारावे, यासाठी त्यांना संविधानाची प्रत  भेट देणार असल्याचे सपकाळ म्हणाले. (Sapkal’s scathing criticism on CM)

 संविधान हे मनुस्मृतीवर आधारीत असावे, अशी रा. स्व. संघाची अपेक्षा होती, गोळवलकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तसे पत्र पाठवले होते. ‘आम्ही विशिष्ट लोक’ हा संघाचा विचार आहे तर संविधानाचा विचार हा ‘आम्ही भारताचे लोक’ असा आहे. गोलवलकर यांचे बंच ऑफ थॉट हे रा. स्व. संघ आणि भाजपाचे बायबल आहे. संविधान नाकारणारा विचार भाजपाचा आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.

काँग्रेस पक्षाची नेहमीच संविधान रक्षणाची भूमिका राहिली आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या पुढाकाराने २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान संविधान सत्याग्रह यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.  नागपूरच्या दीक्षाभूमीपासून सुरु होऊन सेवाग्रामपर्यंत जाणार आहे.

भाजपा नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पनवेल महानगरपालिकेतील भाजपाचे नगरसेवक हरिश केणी, रविकांत म्हात्रे, कैलास घरत यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

काँग्रेस तालुकाध्यक्ष पदासाठी मुलाखती
टिळक भवन दादर येथे काँग्रेस तालुकाध्यक्ष पदासाठी निरीक्षकांनी शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य खासदार चंद्रकांत हांडोरे, नसीम खान, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, यु. बी. व्यंकटेश, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड गणेश पाटील उपस्थित होते.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर