मनसेच्या संतोष धुरींचा भाजपमध्ये प्रवेश

Santosh Dhuri joins BJP

मुंबई : प्रतिनिधी :   मुंबई महापालिकेची निवडणूकीचा प्रचार रंगात आला असताना भाजपाकडून शिवसेना ठाकरे गट व मनसेला धक्के देण्याची तंत्र कायम ठेवले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे संतोष धुरी यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला. मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम व अन्य नेत्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला. धुरी यांचा भाजपा प्रवेश हा ठाकरे बंधूना मोठा धक्का समजला जात आहे. (Santosh Dhuri joins BJP)

धुरी हे वरळीतील १९४ वार्डमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र ही जागा उद्धव ठाकरे यांच्या सेनेला सोडण्यात आली. निशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे संतोष धुरी हे नाराज होते. ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले नसले तरी आपल्याला डावलले गेल्यामुळे नाराज होते.त्यांनी राज यांच्यासह कोणाही नेत्याशी संपर्क ठेवला नव्हता. धुरी यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्याचवेळी ते भाजपात जाणार हे निश्चित झाले होते. धुरी यांनी गेल्या दोन दिवसांत भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. (Santosh Dhuri joins BJP)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर