नाशिक : पाकिस्तान ताब्यात घेणे, पीओके ताब्यात घेणे किंवा दहशतवाद्यांना मारणे हे ईडी, सीबीआय, निवडणूक आयोगाच्या ताब्यात असते तर अमित शहा यांनी करु शकले असते. पण त्यांना ते शक्य नाही. त्यांची मजल कालच्या युद्धात दिसून आली. ते किती डरपोक आणि ढोंगी आहेत हे काल दिसले आहे. त्यांचा पक्ष अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प चालवत आहेत, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. (Sanjay Raut PC)
नाशिक येथे दौऱ्यावर आले असताना संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, प्रफुल्ल पटेल,एकनाथ शिंदे,अजित पवार यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. अजित पवार राज्यात तर सुप्रिया सुळे यांनी दिल्ली सांभाळावी असे विचारले असता संजय राऊत म्हणाले, ही त्यांची आधीपासून योजना आहे. त्यात नवीन काय आहे. महाराष्ट्र अजित पवार यांनी सांभाळावा. सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत काम करावे. शरद पवार दिल्लीत काम करतायेत. पण अजित पवार यांनी ती जबाबदारी दाऊद इब्राहिमला दिली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राष्ट्रीय नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. (Sanjay Raut PC)
एकनाथ शिंदे, अजित पवारांवर टीका
खासदार संजय राऊत म्हणाले, अमित शहा यांच्या मदतीने अजित पवार यांनी शरद पवारांचा पक्ष पळवून नेला आहे. मी राज ठाकरे आणि नारायण राणे यांचे कौतुक करतो. नारायण राणे यांनी पक्ष सोडला आणि स्वत:चा पक्ष स्थापन केला. ही माझी शिवसेना, मीच शिवसेना प्रमुख असा दावा कधीच केला नाही. राज ठाकरे यांनीही मतभेद झाल्यावर स्वत:चा पक्ष काढला आणि राजकारण केले. एकनाथ शिंदे प्रमाणेही त्यांनी माझी शिवसेना खरी, मीच बाळासाहेब ठाकरे हे त्यांनी सांगितले नाही.
राऊत यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, अजित पवार सांगताय की मीच खरा, पक्षाचा बाप, जन्मदाता, तुमच्या व्यासपीठावर बसला आहे आणि तुम्ही म्हणताय मीच राष्ट्रवादीला जन्म दिला. ही भूमिका अजित पवार यांना कळत नसेल तर ते रेम्या डोक्याचे आहेत, असा टोलाही लगावला. (Sanjay Raut PC)