Sangali bribe case : सात लाखांची लाच घेताना महानगरपालिका उपायुक्त जाळ्यात

Sangali bribe case

सांगली : प्रतिनिधी : २४ मजली इमारतीला परवानगी देण्यासाठी सात लाखांची लाच मागणारा महानगरपालिका उपायुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. पोलिसांकडून उपायुक्तावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक झाली आहे. या घटनेने महानगरपालिकेत खळबळ उडाली आहे. (Sangali bribe case)

सांगली महानगरपालिकेचे उपायक्त वैभव साबळे यांनी २४ मजली इमारतीला परवानगी देण्याठी दहा लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. ही हायप्रोफाईल केस असल्याने मुंबईहून आलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. तडजोडीअंती लाचेचा आकडा सात लाखांवर आला. तक्रारदाराच्या तक्रारीची खातरजमा झाल्यानंतर उपायुक्त वैभव साबळे यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून त्यांना अटक केली आहे. तक्रारदाराने माजी आयुक्त शुभम गुप्ता यांच्या नावाचाही फिर्याद उल्लेख केला आहे. (Sangali bribe case)

साबळे यांना लाच घेताना अटक झाली आहे असे सांगलीत वृत्त पसरताच महानगरपालिका विभागीय कार्यालय मंगलधामसमोर बांधकाम व्यावसायिकांनी फटाके वाजवून कारवाईचे स्वागत केले आहे. यापूर्वी इस्लामपुरात मुख्याधिकारी पदावरुन साबळे यांची बदली झाल्यानंतरही फटाक्याची आतषबाजी झाली होती. (Sangali bribe case)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर