सातारा पोलीस अधीक्षकांचे तत्काळ निलंबन करण्याचे उपसभापती निलम गोऱ्हे यांचे आदेश

Repercussions of the Satara Zilla Parishad President election echo in the Vidhan Bhavan

मुंबई : प्रतिनिधी : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत झालेल्या राड्याचे पडसाद विधान भवनात उमटले.  भाजप विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार पक्ष असे महायुती पक्षांमधील मंत्री, आमदार विरोधात असल्याचे चित्र पहायला मिळाले. शिवसेना राष्ट्रवादीच्या आमदारांनी साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशींना निलंबित करा अशी मागणी करत विधानसभेच्या पायऱ्यावर निदर्शने केली. तर विधान परिषदेत उप सभापती निलम गोऱ्हे यांनी पीठासनावरुन पोलिस अधीक्षक दोशी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. दोन्ही सभागृहात सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्यावेळी पोलिसांच्या दडपशाहीचा पाढा सभागृहात वाचला. आणि पोलिस अधीक्षक दोशी यांना बडतर्फ करा अशी मागणी केली. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोशीवर गंभीर आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या घटनेची चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.

विधान परिषदेत आमदार हेमंत पाटील आणि आमदार विक्रम काळे यांनी सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील झालेल्या राड्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, मी ४० वर्षे राजकीय जीवनात असून मला राजकारामध्ये आमच्या जिल्ह्यात असा अनुभव कधीही आला नव्हता. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत संदीप मांडवे आणि अनिल देसाई आमच्याबरोबर होते. ज्यांचे अपहरण झाल म्हणून सांगितले ते बापूसाहेब शिंदे हे राष्ट्रवादीचे शिंदे आमच्याबरोबर बैठकीला होते. आमच्या बैठकीच्या ठिकाणी साध्या वेषातील पाच पोलिस होते. जर त्यांना अटक करायची होती. तिथे का केली नाही. निवडणुकीच्या दिवशी आम्ही चौथ्या मजल्यावर तिथे मेटल डिटेक्टर इथून जात असताना चार पोलिसांनी मला धक्काबुक्की केली. तसेच १०० पोलिस साध्या वेषातील पोलिस चौथ्या माळावर होते. ही मोगलाई आहे का असा प्रश्न त्यांनी विचार आले. चार लाख लोकांतून आम्ही निवडून आलो. मंत्री आहेत. आमच्या दोन्ही सदस्यांना पोलिसांनी पळून घेऊन गेले. (Repercussions of the Satara Zilla Parishad President election echo in the Vidhan Bhavan)

साताऱ्यांचे पोलिस घरगड्यासारखे वागले आहेत असा आरोप करत अधीक्षक तुषार दोशी, एलसीबीचे निरीक्षक देवकर, सहाय्यक निरीक्षक गर्जे आणि त्यांच्याबरोबर १०० मुलांवर तात्काळ कारवाई करुन त्यांना निलंबित करा अशी मागणी शंभूराज देसाई यांनी केली.

सभापती निलम गोऱ्हे  म्हणाल्या, हा प्रकार अतिशय गंभीर प्रकार घडला आहे. जी घटना घडली त्याची माहिती वृत्तपत्रातून आली. पण मी तेवढ्यावर न थांबता मंत्री देसाई यांचे म्हणणे ऐकूण घेतले आहे. हेमंत पाटील हे स्वत: प्रत्यक्षदर्शीच आहेत. सभागृहात गणेश नाईक आणि उदय सामंत हे दोघे मंत्री आहेत. सभागृहात मंत्री सांगतात म्हटल्यावर ते खरंच मानले पाहिजे असा आतापर्यंतचा प्रघात आहे. खरं तर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते. ते काही कारणाने गेले नसतील सुट्टीनंतर आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. मतदान प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांना  साताऱ्याचे पोलिस अधीक्षकांचे तात्काळ निलंबन करावे, असा आदेश उप सभापती गोऱ्हे यांनी दिला.  (Repercussions of the Satara Zilla Parishad President election echo in the Vidhan Bhavan)

विधानसभेत अर्जुन खोतकर यांनी प्रश्न उपस्थित केला. मंत्री शंभुराजे देसाई यांनी झालेली घटना सभागृहात मांडत पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या संपर्क साधून मतदानावर कारवाई करावी असे सांगितले होते. कारागृहातून सभागृहात येत खासदार, आमदार मतदान करतात. राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली होती. सभागृहात जाण्यापूर्वी दोन सदस्यांना मतदानापासून रोखणे हे संविधानाला धरुन नाही. उप मुख्यमंत्री शिंदे यांनीही तुषार दोशीवर गंभीर आरोप केले.  (Repercussions of the Satara Zilla Parishad President election echo in the Vidhan Bhavan)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर