Renaming of IIT Bombay : आयआयटी बॉम्बेचे नाव  मुंबई करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणार

Renaming of IIT Bombay

मुंबई  :  भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री जिंतेद्र सिंह यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यासाठी हे मुंबईच असून आयआयटी बॉम्बेचं नाव आयआयटी मुंबई असे करण्याची विनंती आपण पंतप्रधानांना पत्र पाठवणार आहे, असे त्यांनी सांगितले. (Renaming of IIT Bombay)

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आयआयटी मुंबईतील एका कार्यक्रमात आयआयटी बॉम्बेचे नाव मुंबई केलं नाही यामुळे मला बरं वाटले,असे विधान केल्याने वाद ओढावून घेतला होता. त्यावर मनसे व काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत त्यांना उत्तर दिले होते. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “बॉम्बेचे नाव मुंबई करण्यामागे सर्वात मोठा वाटा हा भारतीय जनता पक्षाचे नेते रामभाऊ नाईकांचा आहे. आमच्याकरता बॉम्बे नाही तर ते मुंबईच आहे. बॉम्बेच्या खुणा या मिटल्या पाहिजेत आणि सगळीकडे मुंबईच असलं पाहिजे. आयआयटी बॉम्बेचं नाव आयआयटी मुंबई असं करण्याची विनंती करणारे पत्र मी स्वतः देशाचे पंतप्रधान आणि मानव संसाधन मंत्र्यांना लिहिणार आहे.” (Renaming of IIT Bombay)

काही लोक सोईस्करपणे, आपल्या मुलांना ज्या शाळेत शिकवतात त्या शाळेचं नाव बदलावे, अशी विनंती करत नाहीत असा टोलाही फडणवीसांनी ठाकरे यांना लगावला.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर