Ravindra Padwal : विशाळगड दंगलीतील मुख्य आरोपी पडवळला १३ महिन्यानंतर अटक

Ravindra Padwal

कोल्हापूर : प्रतिनिधी : विशाळगड दंगलीतील मुख्य आरोपी रवींद्र पडवळ याला तब्बल १३ महिन्यांनी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पडवळ आणि संभाजी साळुंखे यांनी चिथावणी दिल्याने दंगल घडल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. साळुंखे याला यापूर्वीच जामिन मिळाला आहे. या गुन्ह्यात यापूर्वी २४ जणांना अटक झाली आहे. (Ravindra Padwal)

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात माजी खासदार संभाजीराजे यांनी १४ जुलै २०२४ रोजी कार्यकर्त्यांसह विशाळगडावर जाण्याची घोषणा केली होती. या घोषणेपूर्वी पुण्यातील हिंदू बांधव समितीचा प्रमुख रवींद्र पडवळ आणि कोल्हापूरातील सेवाव्रत प्रतिष्ठानचा कार्यकर्ता संभाजी उर्फ बंडा साळुंखे हे कार्यकर्त्यांसह विशाळगडावर पोचले होते. त्यांनी विशाळगडावील पायथ्याशी प्रचंड तोडफोड केली होती. अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांची घरे उधवस्त करण्याचा प्रयत्न केली. परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली. या घटनेचे पडसाद राज्यासह देशभर उमटले. शाहूवाडी पोलिसांनी ३०० ते ४०० जणांवर गुन्हा दाखल केला होता. (Ravindra Padwal)

गुन्हा दाखल झाल्यानंतर पडवळ हा फरार होता. तीन ऑक्टोबर २०२४ रोजी कणेरी मठावरील एका कार्यक्रमात सहभागी झाल्याचे फोटो सोशल मिडियात व्हायरल झाले होते. त्यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. तरीही पडवळला अटक झाली नव्हती. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. (Ravindra Padwal)

या गुन्ह्यातील प्रमुख संशयित आरोपी रवींद्र पडवळ पसार झाला होता. मंगळवारी रात्री उशिरा शाहूवाडी पोलिसांनी पडवळला अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पडवळच्या अटकेमुळे तपासाला गती मिळणार आहे. या गुन्ह्यात पडवळवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा सामाजिक षढयंत्राचा भाग आहे का याचाही पोलिस तपास करणार आहेत. (Ravindra Padwal)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?