Bal Karve passes away: ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन

Bal Karve passes away

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटविश्वावर शोककळा पसरली आहे. अभिनय क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. गुंड्याभाऊ हे त्यांनी साकारलेलं पात्र विशेष गाजले होते. (Bal Karve passes away)

त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या होत्या. बन्याबापू (१९७८), लपंडाव (१९९३), गोडी गुलाबी (१९९१),  हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे.

बाळ कर्वे यांचा जन्म २५ ऑगस्ट १९३० ला झाला होता. त्यांनी चिमणराव मालिकेत केलेली गुंड्याभाऊ ही भूमिका लोकांच्या मनात आजही घर करुन राहिली आहे. ही मालिका १९७९ मध्ये प्रसारित झाली होती. या मालिकेतून गुंड्याभाऊ साकारणाऱ्या बाळ कर्वेंना लोक गुंड्याभाऊ या नावानेच हाक मारु लागत.

रंगमंचावरही वावर

गेली अनेक दशके कलाक्षेत्रावर आपला ठसा उमटवणाऱ्या बाळ कर्वे यांचा रंगमंचावरही सहज वावर होता. विजया मेहता आणि विजया जोगळेकर-धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नाट्य प्रवासाची सुरुवात केली. लालन सारंग यांच्याबरोबर ‘रथचक्र’, ‘तांदूळ निवडता निवडता’, भक्ती बर्वेंबरोबर ‘मनोमनी’, ‘आई रिटायर होते’, डॉ. गिरीश ओकांबरोबर ‘कुसुम मनोहर लेले’ अशी नाटके त्यांनी केली आहेत. (Bal Karve passes away)

गुंड्याभाऊ केला अजरामर

भारतीय दूरचित्रवाणी मालिकांची नांदी देणारी चिं. वि. जोशी यांच्या ‘चिमणराव’ या मालिकेत त्यांनी गुंड्याभाऊंची भूमिका साकारली होती. मिळालेल्या संधीचे सोने कसे करावे याचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांनी साकारलेल्या गुंड्याभाऊ या भूमिकेकडे पाहता येईल. त्यांनी ती भूमिका अजरामर केली. (Bal Karve passes away)

बालरंगभूमीसाठी योगदान बाळ कर्वे ‘कॉलेज ऑफ इंजिनीअिरग पुणे’ येथून ते‘स्थापत्य अभियंता’ झाले. त्यानंतर ते मुंबई महानगरपालिकेत स्थापत्य अभियंता म्हणून नोकरीला लागले. त्यांनी बत्तीस वर्षे नोकरी केली. नोकरीच्या निमित्ताने ते मुंबईत पार्ल्यात एका नातेवाईकाकडे राहात होते. त्याच ‌इमारतीत सुमंत वरणगांवकर राहायचे. ते रंगभूमीशी संबंधित होते. नाटकाची आवड असल्यामुळे त्यांची मैत्री झाली आणि दोघांनी मिळून ‘किलबिल बालरंगमंच’ अशी छोटीशी संस्था स्थापन केली आणि तिच्यासाठी ते बालनाट्ये बसवू लागले.

Related posts

ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?