मुंबई : प्रतिनिधी : महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजकीय इच्छाशक्तीवर पाच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस प्रश्न विचारत होते. मग आता मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकीय इच्छाशक्ती का दाखवत नाहीत, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (Raut’s attack on Mahayuti)
खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांसह महायुतीच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान, मुख्यमंत्री, विरोधकांच्या अटकेसाठी संविधान बदलू शकता मग मराठ्यांच्या आरक्षणासाठी संविधान का बदलत नाही, असा थेट सवाल राऊत यांनी केला आहे. त्याचवेळी सरकारने सर्व विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करावी आणि त्यांना सोबत घेत कॅबिनेटसह जरांगे याची भेट घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. (Raut’s attack on Mahayuti)
संजय राऊत यांनी महायुतीतील प्रमुख नेत्यांवरही टीकेची तोफ डागली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगळ्या मार्गाने आंदोलकांना मदत करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परशुराम महामंडळवाले आहेत तर त्यांचे मित्र अजित पवार चीनच्या तटस्थ भिंतीसारखे आहेत, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली. अजित पवार यांच्याकडून याबाबत काहीच प्रतिक्रिया नाही. तिन्ही नेत्यांची तीन बाजूला तोंडे आहेत मग राजकीय इच्छाशक्ती येणार कुठून, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. (Raut’s attack on Mahayuti)
पाच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीवर राजकीय इच्छाशक्ती नसल्याचा आरोप फडणवीस करत होते तर आता ते राजकीय इच्छाशक्ती का दाखवत नाहीत, असा सवाल संजय राऊत यांनी केला. राजकीय इच्छाशक्तीअभावी मराठा आरक्षणासाठी संविधानची चौकट बदलणार कशी, असेही राऊत यांनी विचारले. (Raut’s attack on Mahayuti)