अजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कार

Ratnakar Poetry Award presented to Azeem Nawaz Rahi

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणा-या २०२५ या वर्षातील राज्यस्तरीय रत्नाकर काव्य पुरस्कारासाठी अजीम नवाज राही यांच्या ‘वळीवाच्या वेळा‘ या  संग्रहाची निवड करण्यात आली आहे. दहा हजार रुपये, गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. (Ratnakar Poetry Award presented to Azeem Nawaz Rahi)

या पुरस्कार निवडीसाठी परीक्षक म्हणून कवी, समीक्षक डॉ. रफीक सूरज यांनी काम पाहिले. पुरस्कार पुरस्कार प्रदान समारंभ रविवारी २४ मे २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजता शेठ रामभाई सामाणी सभागृह, शिवाजी उद्यमनगर,कोल्हापूर येथे होणार आहे. धम्मपाल रत्नाकर काव्य पुरस्कार यापूर्वी श्रीधर नांदेडकर, श्रीकांत देशमुख, वीरधवल परब, कल्पना दुधाळ, संजीवनी तडेगावकर, अरुण इंगवले, पी. विठ्ठल, सुरेश सावंत, अजय कांडर, सारिका उबाळे, सुचिता खल्लाळ, पद्मरेखा धनकर, दीपक बोरगावे, कविता मुरुमकर, हबीब भंडारे, गोविंद काजरेकर, राजेंद्र दास, केशव देशमुख, कीर्ती पाटसकर, अनिल धाकू कांबळी, ऐश्वर्य पाटेकर,संजय कृष्णाजी पाटील, सुनिता झाडे यांना देण्यात आला आहे. साहित्य सभेचे कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी ही माहिती दिली आहे. (Ratnakar Poetry Award presented to Azeem Nawaz Rahi)

Related posts

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. आर.के. कामत यांची निवड

भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर

राष्ट्रवादीचे प्रवक्ते विलास लवांडेंना अटक, संग्राम भंडारे मोकाट