Rahul warns from Bihar: ॲटम बॉम्ब पाहिला, आता… : भाजपला इशारा

rahul gandhi

पाटणा : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सध्या बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा सुरू आहे. या यात्रेला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहे. इंडिया आघाडीतील राजकीय पक्षांचे नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. (Rahul warns from Bihar)

या यात्रेदरम्यान, राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा खणखणीत इशारा दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्याने निवडणूक आयोग आणि भाजपविरोधात राहुल गांधी काय बोलणार किंवा त्यांची काय पोलखोल करणार याची उत्सुकता आहे.

राहुल गांधी यावेळी म्हणाले, आम्ही तुमच्या मतचोरीचा पुन्हा एकदा पर्दाफाश करणार आहोत. भाजपच्या लोकांनी आता तयार रहावे, आम्ही कर्नाटकच्या निमित्ताने ॲटम बॉम्ब फोडला होता. आता हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहोत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. (Rahul warns from Bihar)

बिहारमधील मतदार अधिकार यात्रा ऐतिहासिक होण्यासाठी लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, दीपांकर भट्टाचार्य, मुकेश सहनी, बिहार काँग्रेस नेतृत्व, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच इंडिया आघाडीतील नेते आणि कार्यकर्त्यांनाही राहुल गांधी यांनी धन्यवाद दिले. (Rahul warns from Bihar)
बिहारमध्ये एकाही मताची चोरी होणार नाही, असा आम्ही निर्धार करतो, तसेच लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण आम्ही पूर्ण ताकदीनिशी करू, असा संकल्पही त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवला.

Related posts

फडणवीसांचे चॅलेंज सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदेंनी स्वीकारले

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर

सरकारने एफआयआर घ्यायला का नकार दिला?;  सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांना  सवाल