Rahul on SC, ST : मागासवर्गीयांच्या जागा जाणूनबुजून रिकाम्या ठेवण्याचे षडयंत्र : राहुल गांधी

Rahul gandhi

नवी दिल्ली : केंद्रीय विद्यापीठांमध्ये हजारोंच्या संख्येने मागासवर्गीय प्राध्यापकांच्या जागा रिक्त ठेवण्यात आल्याची टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी (२५ जुलै) केली. या नोकऱ्यांमधील अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसी उमेदवारांच्या किती जागा रिक्त आहे याची टक्केवारीच त्यांनी यावेळी सादर केली. (Rahul on SC, ST)

यासंबंधीची पोस्टही त्यांनी ‘एक्स’वर केली आहे. बहुजनांचे हक्क कशा पद्धतीने हिसकावून घेतले जात आहेत ते संसदेत मोदी सरकारने जी आकडेवारी सादर केली आहे त्यावरून लक्षात येते. हा संघटित मनुवादी कट असल्याचे स्पष्ट होते, असा हल्लाबोलही राहुल गांधी यांनी केला. (Rahul on SC, ST)

सरकारने रिक्त जागांची जी आकडेवारी सादर केली आहे. ती राहुल गांधी यांनी शेअर केली आहे. त्यानुसार, केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रोफेसरपदाच्या जागा – अनुसूचित जमाती ८३%, ओबीसी ८० 80% आणि अनुसूचित जातीच्या ६४ टक्के जागांचा समावेश आहे. तसेच सहायक प्राध्यापकांच्या जागांची टक्केवारी अनुक्रमे ६५ टक्के, ६९ आणि ५१ टक्के अशी आहे.

एवढ्या संख्येने जागा रिकाम्या ठेवणे ही चूकभूल नाही तर पद्धतशीरपणे रचलेला कट आहे. बहुजनांना शिक्षण, संशोधन आणि धोरणांपासून बाहेर ठेवण्याची ही नीती आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. (Rahul on SC, ST)

‘नॉट फाउंड सुटेबल’च्या नावाखाली हजारो लायक उमेदवारांना मनुवादी विचारसरणीमुळे अयोग्य घोषित केले जात आहे. त्यावर सरकार काहीही जबाबदारी घेण्यास तयार नाही.

या सर्व रिक्त जागा भरण्याची कार्यवाही तातडीने झाली पाहिजे, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर