अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताच्या के.एल. राहूल (१००), ध्रुव जुरेल (१२५), आणि रवींद्र जडेजा (नाबाद १०४) यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या दिवशी शतके झळकावली. तिघांच्या शतकाने भारताने दिवअखेर पाच बाद ४४८ धावा केल्या. के.एल. राहूलने घरच्या मैदानावर नऊ वर्षानंतर शतकांचा दुष्काळ संपवला. त्याने कारकीर्दीतील ११ वे शतक झळकावले. भारताने २८६ धावांची आघाडी घेतली असून भारतीय संघाच्या विजयाची आशा चांगलीच उंचावली. (Rahul Dhruv, Jadeja’s centuries)
कालच्या २ बाद १२१ धावसंख्येवरुन भारताने डावाची सुरुवात केली. राहूलने कर्णधार शुभमन गिलसोबत तिसऱ्या गड्यांसाठी ९८ धावांची भागीदारी केली. रोस्टन चेसचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न त्याचा स्लीपमध्ये झेल टिपला. त्याने ५० धावा केल्या. त्यानंतर के.एल. राहूलने शतक झळकावले. डिसेंबर २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध् शतक झळकावले होते. उपाहारानंतर ड्राईव्ह करत असताना चेंडू उडाल्याने जस्टिन ग्रीव्हजने त्याचा झेल पकडला आणि राहूलची शतकी खेळी समाप्त झाली. साई सुदर्शनाला सात धावांवर रॉस्टन चेसने पायचीत पकडले. (Rahul Dhruv, Jadeja’s centuries)
राहूल बाद झाल्यानंतर ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांनी धावसंख्येला गती दिली. जुरेलने वेगवान खेळी करत विंडीजच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने १५ चौकार आणि तीन षटकारासह १२५ धावा केल्या. जुरेलने सहाव्या कसोटीत शतक पूर्ण केले. जुरेल आणि जडेजाने पाचव्या गड्यासाठी २०६ धावांची भागीदारी केली. ध्रुव जुरेलची खेळी खेरी पेरीने संपुष्टात आणली. होपने त्याचा झेल टिपला. जडेजाने आपले शतक पूर्ण केले. एकाच दिवसात भारतीय खेळाडूंनी शतके झळकावली. दिवसअखेर खेळ थांबला तेव्हा जडेजाने १०४ धावावर तर वॉशिग्टंन सुंदर ९ धावांवर खेळत होते. रॉस्टन चेसने दोन तर खेरी पेरी, जोमल वॅरिकन आणि जायडेन सेलेसने प्रत्येकी एक गडी बाद केला. (Rahul Dhruv, Jadeja’s centuries)