राधानगरीला मेडिकल व टुरिझम हब बनवणार : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

Radhanagari will be developed into a medical and tourism hub

कोल्हापूर : प्रतिनिधी :  भविष्यात राधानगरी ग्रामीण रुग्णालयात १०० बेडची सोय, तहसील कार्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण, आयुष वेलनेस सेंटर, सोळांकूर रुग्णालयातील अत्याधुनिक सुविधा, अद्ययावत आरोग्य सेवा सुविधांनीयुक्त तारळे उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन सुसज्ज इमारतीचे लोकार्पण आदी विविध विकास कामे आरोग्य विभागाअंतर्गत होत असून भविष्यात राधानगरी मेडिकल व टुरिझम हब बनेल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला. (Radhanagari will be developed into a medical and tourism hub)

 पालकमंत्री आबिटकर म्हणाले, शासनाच्या विविध योजनांचा व आरोग्य विषयक सेवा सुविधांचा लाभ राज्यासह राधानगरी तालुक्यातील नागरिकांना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातील एक भाग म्हणून ग्रामीण रुग्णालयात टू डी इको कार्डिओग्राफी सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. विविध आजारांनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांच्या जीवाला टू डी इको न झाल्यामुळे धोका पोहोचू शकतो. अशी परिस्थिती उद्भवणाऱ्या रुग्णांना या सेवेसाठी शहरात जावे लागणार नाही. गरजू रुग्णांना राधानगरीमध्येच शासकीय रुग्णालयात या सेवेचा लाभ मिळेल. याबरोबरच या रुग्णालयात १०० बेड ची सुविधा देण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला असून लवकरच तो मंजूर होईल. हे रुग्णालय अद्ययावत होण्यासाठी फेस लिफ्टिंगच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर केला आहे. राधानगरी तालुक्यात आयुष वेलनेस सेंटर उभारण्यात येत असून यामुळे राधानगरी ची वेगळी ओळख निर्माण होईल. (Radhanagari will be developed into a medical and tourism hub)

राज्यातील पहिले कॅशलेस हॉस्पिटल कोल्हापुरात

राज्यातील पहिले कॅशलेस हॉस्पिटल कोल्हापूर जिल्ह्यात लवकरच सुरु होईल. तसेच गारगोटी मध्ये अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण असे नेत्रालय सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक भागातील नागरिकांशी संवाद साधून आरोग्यविषयक समस्या जाणून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येत आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून आरोग्य संवाद यात्रा आरोग्य विभागाच्या कामासाठी एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राधानगरी तालुका महाराष्ट्राच्या पर्यटनाची नवी ओळख होईल

दाजीपूर अभयारण्यात वाघाचे दर्शन झाले, ही जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने चांगली बाब आहे. वाघाचे दर्शन होत असणाऱ्या दाजीपूर अभयारण्याला हजारो पर्यटकांनी दररोज भेट द्यावी, यासाठी पर्यटन विकासाच्या दृष्टीने जिल्ह्याला आवश्यक त्या पायाभूत सुविधा देण्यात येत आहेत. महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशात दाजीपूर अभयारण्य आणि राधानगरी तालुका भविष्यात महाराष्ट्राच्या पर्यटनाची नवी ओळख होईल, विश्वास पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी व्यक्त केला.

 राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये अत्याधुनिक टू डी इको कार्डिओग्राफी सेवेचे लोकार्पण पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. दिलीप माने, ट्रायकॉग हेल्थ इंडियाचे संस्थापक कार्डिओलॉजिस्ट डॉ. चरित भोजराज, कुष्ठरोग विभागाच्या सहसंचालक डॉ. हेमलता पालेकर, आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम.डी. देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, राधानगरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील, भुदरगडच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र शेटे, पंचायत समिती सभापती आर. वाय. पाटील, राधानगरी पंचायत समितीच्या उपसभापती अश्विनी चौगुले, जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव, संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुका अध्यक्ष दीपक शेट्टी उपस्थित होते. प्रास्ताविक अमोल पाटील यांनी केले. आभार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात यांनी मानले. (Radhanagari will be developed into a medical and tourism hub)

Related posts

शाळांच्या संवर्धनासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविणार : आमदार कौस्तुभ गावडे

मुश्रीफांविरोधात २७०० पानांची तक्रार ईडी कडे देणारे किरीट सोमय्या  गप्प का?

ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांचे निधन